Home » क्रीडा, ठळक बातम्या » देशात राष्ट्रीय क्रीडा अकादमी स्थापन होणार

देशात राष्ट्रीय क्रीडा अकादमी स्थापन होणार

=मणिपुरात क्रीडा विश्‍वविद्यापीठ : जेटली=
नवी दिल्ली, [१० जुलै] – केन्द्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात क्रीडेकडे विशेष लक्ष दिले व राष्ट्रीय क्रीडा अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
क्रीडा विषय येताच अनेक सदस्यांचे लक्ष कोणकोणत्या घोषणा होतात, याकडे लागले होते. त्यावेळी अरुण जेटली यांनी उपरोक्त घोषणा केली. यासोबतच जम्मू-काश्मीरात आंतरराष्ठ्रीयस्तरावरील इनडोअर आणि आउट डोअर स्टेडियमची निर्मिती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मणिपुरात क्रीडा विद्यापीठाचीही स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी चालु वर्षात १०० कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे.
देशात अनेक राष्ट्रीय क्रीडा अकादमी काढण्यावर जेटली यांचा भर होता. नेमबाजी, ऍथलेटिक्स ट्रॅक, कुस्ती, भारोत्तोलन यासह अन्य खेळांमध्ये खेळाडू घडविण्याज्ञाठी या अकादमींची मदत मिळू शकेल.
महिला खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी शंभर कोटींचा निधीही उपलब्ध केला जाणार आहे. येत्या आशियाई क्रीडा महोत्सवाकडे बघता अरुण जेटली यांनी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला. याचाही लाभ खेळाडूंना मिळेल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14131

Posted by on Jul 10 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2400 of 2455 articles)


=२४ वर्षांनंतर अर्जेंटिना अंतिम फेरीत= साओ पाउलो, [१० जुलै] - १२० मिनिटे रोमहर्षक ठरलेल्या उपांत्य सामन्यात लियोनेल मेस्सी याच्या नेतृत्वाखालील ...

×