Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » देशात वेगाने वाढताहेत उच्च रक्तदाबाचे रुग्ण

देशात वेगाने वाढताहेत उच्च रक्तदाबाचे रुग्ण

=६० टक्के नागरिकांना नसते जाणीव, सीएसआयचे सर्वेक्षण=
bp-blood-pressureनवी दिल्ली, [२६ सप्टेंबर] – प्रचंड धावपळीचे जीवन, अनियमित दिनचर्या, वाढती स्पर्धा, जगण्यासाठी करावा लागणारा तीव्र संघर्ष, करीअर, कौटुंबिक कलह व अन्य कारणांमुळे लोकांवरील मानसिक ताणतणाव वाढत आहेत. या सार्‍यांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. विशेष गांभीर्याची गोष्ट अशी की ६० टक्के भारतीयांना आपल्याला उच्च रक्तदाब आहे, याची जाणीवच नसते. केव्हातरी, कुठेतरी केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना डॉक्टरांकडून याची माहिती मिळते आणि मग औषधोपचारांसाठी त्यांची धावपळ सुरू होते.
कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने (सीएसआय) या विषयावर देशातील २४ राज्यांत व्यापक सर्वेक्षण केले असून, त्यातून निघालेले निष्कर्ष धक्कादायक असेच आहेत.
देशभरातील विविध वयोगटातील एकूण १ लाख ८ हजार नागरिकांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता एकूण एक तृतीयांश लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे निष्पन्न झाले. सर्वेक्षणातील निष्कर्ष आज राजधानी दिल्लीत जाहीर करण्यात आले. नागरिक जर उच्च रक्तदाबाबत असेच अनभिज्ञ राहिल्यास भविष्यात हृदयरोग्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली.
उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि त्याच्याशी संबंधित जोखीम घटक, याचा सर्वेक्षणात समावेश होता. ४२ टक्के लोकांचा रक्तदाब व हृदयविकार औषधोपचारानंतरही नियंत्रित होत नसल्याचेही अभ्यासात आढळून आले आहे. विशेष म्हणजे केरळसारखे राज्य, जेथे उत्तम वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध आहेत, तेथेही उच्च रक्तदाबाचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळले. सर्वात गंभीर बाब म्हणजे २५ टक्के उच्चरक्तदाबाचे रुग्ण ३१ ते ४५ वयोगटातील होते. मात्र, आपल्याला ‘हाय बीपी’ आहे याची त्यांना जाणीवच नव्हती. एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांचा उच्च रक्तदाब नियमित औषधोपचाराने नियंत्रित ठेवणे हे फार मोठे आव्हान असल्याचे सीएसआयचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोक सेठ यांनी सांगितले. उच्च रक्तदाब असलेले सर्वजण ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, अशी माहिती अपोलो हॉस्पिटलचे (हैदराबाद) ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिवकुमार यांनी दिली. हाय बीपी असलेल्यांना तीव्र हृदयाघाताचा (हार्ट अटॅक) झटका बसण्याची अधिक शक्यता असते. शिवाय हृदयविकाराच्या धोक्याची पातळी गाठण्याआधीच त्यांना हार्ट अटॅक येण्याची भीती असते, असेही तज्ज्ञांनी नमूद केले. उच्च रक्तदाब आणि हृदयविकार फक्त वृद्ध वा वरिष्ठ नागरिकांनाच होतो, ही गैरसमज आता दूर केला पाहिजे, असे डॉ. शिवकुमार यांनी सांगितले.
सीएसआयचे अध्यक्ष डॉ. एच. के. चोप्रा म्हणाले, हे निष्कर्ष म्हणजे उद्याच्या भारतासाठी एक गंभीर इशाराच असून, लोकांनी ताबडतोब प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले पाहिजेत. सीएसआय यासाठी नक्कीच पुढाकार घेईल, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24065

Posted by on Sep 27 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1404 of 2453 articles)


=इस्टेट महासंचालनालयाने बजावली नोटीस= नवी दिल्ली, [२६ सप्टेंबर] - सीबीआयच्या कचाट्यात अडकलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, माजी केंद्रीय मंत्री ...

×