Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » देशात ११ अणुऊर्जा तज्ज्ञांचा ४ वर्षांत गूढ मृत्यू

देशात ११ अणुऊर्जा तज्ज्ञांचा ४ वर्षांत गूढ मृत्यू

=२००९ ते २०१३ या चार वर्षांमध्ये ११ अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती=
ATOMIC ENERGY DEPARTMENT INDIAनवी दिल्ली, [९ऑक्टोबर] – देशभरात २००९ ते २०१३ या चार वर्षांमध्ये ११ अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती अण्ऊर्जा विभागाच्या ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे.
अणूऊर्जा विभागाच्या प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या आठ शास्त्रज्ञ व अभियंत्यांचा स्फोटात, समुद्रात बुडून किंवा गळफास लावून मृत्यू झाला आहे. अन्य तिघांपैकी दोघांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे तर एकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. हरियाणा येथील राहुल सेहरावत यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत यासंदर्भात माहिती मागितली होती. त्यावर अणुऊर्जा विभागाने ही माहिती दिली आहे.
बार्क, ट्रॉम्बे येथे कार्यरत असलेल्या सी गटातील दोन तज्ज्ञांचे मृतदेह २०१० मध्ये त्यांच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत आढळले होते. रावतभाटा येथे एका तज्ज्ञाचा मृतदेह २०१२ मध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळला होता. बार्कमधील एका प्रकरणाबाबत पोलिसांनी आजारपणाचे कारण दिले आहे. तसेच भाभा अणू संशोधन केंद्रातील रसायनशास्त्राच्या प्रयेागशाळेमध्ये दोन संशोधक सहायकांचा अचानक लागलेल्या आगीत मृत्यू झाला होता. मात्र त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता. अद्यापही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. आरआरसीएटीच्या ड श्रेणीच्या एका शास्त्रज्ञानेही कथितरीत्या आत्महत्या केली होती. यानंतर या प्रकरणाची फाईलही पोलिसांनी बंद केली. तर कल्पकममध्ये कार्यरत असलेल्या आणखी एका शास्त्रज्ञाने २०१३ मध्ये कथितरित्या समुद्रात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती.
दरम्यान, गेल्या काही वर्षात शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे याची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी चेतन कोठारी यांनी ऍड. आशीष मेहता यांच्यामार्फत जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25073

Posted by on Oct 10 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1354 of 2453 articles)


नवी दिल्ली, [९ ऑक्टोबर] - पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचे मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रम शिवसेनेच्या दबावामुळे रद्द करण्यात आल्यानंतर ...

×