Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » देश तोडणार्‍यांचे समर्थन वैचारिक दिवाळखोरीच

देश तोडणार्‍यांचे समर्थन वैचारिक दिवाळखोरीच

=अरुण जेटलींचा राहुल गांधींवर हल्ला=
arun jaitley5वृदांवन, [६ मार्च] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देत, देश तोडण्याची भाषा बोलणार्‍यांचे समर्थन करणारे कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज रविवारी जोरदार हल्ला चढविला. राहुल गांधी आता वैचारिक दिवाळखोर झाले आहेत आणि इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांनीही जे केले नव्हते, ते कृत्य त्यांनी केले आहे, अशी घणाघाती टीका जेटली यांनी केली.
यावेळी जेटली यांनी देशाचे तुकडे करण्याची भाषा करणारा जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारवरही प्रहार केला. भारतविरोधी घोषणा दिल्याबद्दल तो तुरुंगात गेला आणि जामीन मिळाल्यानंतर त्याने ‘जय हिंद’ची घोषणा देत तिरंगाही फडकविला. हाच खरा आमचा विजय आहे. राष्ट्राप्रति आम्ही आपले कर्तव्य पार पाडले, असे जेटली यांनी सांगितले. भाजयुमोच्या समारंभाला ते संबोधित होते.
जिहादी आणि नक्षली विचारसरणीच्या लोकांना कॉंगे्रसचे उपाध्यक्ष पाठिंबा देतात, हे या देशाचे सर्वांत मोठे दुर्दैव आहे. आपल्या १०० वर्षांपेक्षा जास्त काळाच्या इतिहासात कॉंगे्रस पक्ष देश तोडणार्‍यांच्या विरोधात राहिला आहे. पण, राहुल गांधी यांच्या कारकिर्दीत आता नवी प्रथा सुरू झाली आहे. शिक्षणाचे मंदिर असलेल्या विद्यापीठात काही लोक याकुब मेमनला, तर काही लोक अफझल गुरूला श्रद्धांजली देतात. या लोकांना काही जिहादी शक्तींचेही समर्थन मिळते. त्या कार्यक्रमांमध्ये देश तोडण्याची भाषा बोलली जाते. पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली असता, राहुल गांधी यांच्यासारखा नेता त्यांच्या समर्थनार्थ तिथे जातो आणि त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतो. त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे हे सर्वांत मोठे उदाहरणच आहे, अशी टीका जेटली यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27063

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (753 of 2453 articles)


=पणजीकर अवाक्= पणजी, [६ मार्च] - केंद्रीय मंत्री म्हटला की सुरक्षा रक्षकांचा गराडा, भला मोठा ताफा आणि नेते व कार्यकर्त्यांचा ...

×