Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दोन लाखांवर सरकारी नोकर्‍या!

दोन लाखांवर सरकारी नोकर्‍या!

=बेरोजगार तरुणांसाठी अच्छे दिन=
govt-jobsनवी दिल्ली, [१८ एप्रिल] – देशातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी असून, लवकरच त्यांच्या जीवनात अच्छे दिन येण्याचे संकेत आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने येत्या दोन वर्षांत विविध मंत्रालयात दोन लाखावर तरुणांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रातील विविध मंत्रालयात सहा लाखांवर पदे रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांत ब आणि क श्रेणीची पदे भरण्यातच आली नाही, त्यामुळे विविध मंत्रालयांना मनुष्यबळ टंचाईचा सामना करावा लागत आहे. याचा मंत्रालयांच्या कामगिरीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत विविध मंत्रालयात पदभरती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काही मंत्रालयात पदतभरतीची ही प्रक्रिया सुरूही झाली आहे.
१ मार्च २०१५ ला केंद्रीय कर्मचार्‍यांची संख्या देशात ३३ लाख ५ हजार होती. यात रेल्वेच्या १३ लाख २६ हजार ४३७ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मात्र, केंद्रीय सुरक्षा दलातील कर्मचार्‍यांच्या आकड्यांचा यात समावेश करण्यात आला नाही. १ मार्च २०१६ ला यात १ लाख ८८ हजाराने वाढ होत केंद्र सरकारी कर्मचार्‍यांची संख्या ३४ लाख ९३ हजार झाली. १ मार्च २०१७ ला ही संख्या ३५ लाख २३ हजार होण्याचा अंदाज आहे. म्हणजे मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या संख्येत २ लाख २० हजाराने वाढ होणार आहे.
महसूल विभागात सर्वाधिक म्हणजे ७० हजार कर्मचार्‍यांची भरती होणार आहे. महसूल विभागात आयकर, अबकारी विभाग आणि जकात विभागाचा समावेश होतो. विविध प्रकारच्या केंद्रीय निमलष्करी दलात ४७ हजार सुरक्षा कर्मचार्‍यांची भरती होण्याचे अनुमान आहे. केंद्रीय गृहमंत्रालयात सहा हजार नव्या कर्मचार्‍यांची भरती होईल, असा अंदाज आहे.
मंत्रिमंडळ सचिवालयात सध्या ९०० कर्मचारी आहेत, यात ३०० कर्मचार्‍यांची भर पडत ही संख्या १२०० होणार आहे. शहरी विकास मंत्रालयात गेल्या दोन वर्षांत सहा हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली आहे. त्याखालोखाल खाण मंत्रालयात ४३९९ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गेल्या दोन वर्षांत २२०० कर्मचार्‍यांची भरती केली आहे. अंतरिक्ष विभागात एक हजार कर्मचार्‍यांना घेण्यात आले.
संपुआ सरकारच्या कार्यकाळात पदभरती पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्याचा परिणाम देशातील बेरोजगार तरुणांवर झाला होता. सरकारी नोकरीची दार त्यांच्यासाठी बंद झाली होती. मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीची दारे उघडली आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27888

Posted by on Apr 19 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (469 of 2453 articles)


=इशरत जहॉं प्रकरण, किरेन रिजिजू यांचे टीकास्त्र= नवी दिल्ली, [१८ एप्रिल] - इशतर जहॉं बनावट चकमक प्रकरणात संपुआ सरकारने तिला ...

×