Home » आसाम, ठळक बातम्या, राज्य » दोन वर्षांत सीमा सील करणार

दोन वर्षांत सीमा सील करणार

=घुसखोरी रोखण्याचा सोनोवाल यांचा निर्धार=
sarbananda-sonowal1गुवाहाटी, [२१ मे] – बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी कायमची रोखण्याचा निर्धार व्यक्त करताना, बांगलादेशसोबतच्या सर्व सीमा पूर्णपणे सील करण्याची प्रक्रिया दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती आसामचे भावी मुख्यमंत्री आणि भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते सर्वानंद सोनोवाल यांनी आज शनिवारी येथे दिली.
सीमेवरून होणारी घुसखोरी रोखणे हेच आपल्या सरकारचे प्राधान्य राहणार आहे. दोन वर्षांत सीमा सील करण्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गेल्या जानेवारीत करीमगंज जिल्ह्यातील सीमावर्ती भागाच्या भेटीदरम्यान दिली होती. सीमेवर असलेल्या नद्यांसह आसामातील सर्व सीमा सील करण्यासाठी आपले सरकार तातडीने पावले उचलणार आहे, असे सोनोवाल यांनी एका विशेष मुलाखतीत सांगितले.
घुसखोरी रोखण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत स्वीकारणार आहात, घुसखोरीविरोधी कायदा तयार करणार आहात काय, असे विचारले असता, ते म्हणाले की, आसाममधील नागरिकांच्या नोंदणीचे रजिस्टर आम्ही अद्ययावत करणार आहोत. त्यानंतर कोण नागरिक आहे आणि कोण घुसखोर, हे आपोआपच स्पष्ट होईल. याच आधारावर घुसखोरीची समस्या सुटेल आणि जे घुसखोर आहेत, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
वाघा सीमेप्रमाणेच आसामातही कार्यक्रम
पाकिस्तानला जोडणार्‍या पंजाबमधील वाघा सीमेवर ज्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित केला जातो, तसाच कार्यक्रम आम्ही देखील आसामातील भारत-बांगलादेश सीमेवर आयोजित करणार आहोत. आम्ही हा सीमावर्ती भाग पर्यटन स्थळ म्हणून विकसित करू. हा कार्यक्रम पाहण्याची नागरिकांनाही मुभा राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28397

Posted by on May 22 2016. Filed under आसाम, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसाम, ठळक बातम्या, राज्य (297 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२१ मे] - स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आलेले तेजस हे लढाऊ विमान राफेलइतकेच श्रेष्ठ आणि ...

×