Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दोषींवर योग्य ती कारवाई करणार : नकवी

दोषींवर योग्य ती कारवाई करणार : नकवी

=शहीद भगतसिंग यांचा अतिरेकी असा उल्लेख=
mukhtar-abbas-naqviनवी दिल्ली, [२८ एप्रिल] – दिल्ली विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकात शहीद भगतसिंग यांचा उल्लेख क्रांतिकारी अतिरेकी असा करण्यात आल्याच्या मुद्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी आज राज्यसभेत तीव्र भावना व्यक्त केल्या. यावर सभागृहाच्या भावना संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आणि यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन सांसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना द्यावे लागले.
जदयुचे के. सी. त्यागी यांनी आज शून्य तासात हा मुद्दा उपस्थित केला. देशाच्या स्वतंत्र्यलढ्यात ज्यांचे मोठे योगदान आहे, देशासाठी जे शहीद झाले, त्यांचा उल्लेख दिल्ली विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकात अतिरेकी असा करण्यात आला, हे देशाचे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले. यासंदर्भात तातडीने दुरुस्ती करण्याची आणि यासाठी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यागी यांनी केली. सर्वपक्षीय सदस्यांनी के. सी. त्यागी यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला पाठिंबा देत सरकारने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या चर्चेत हस्तक्षेप करत सांसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, सभागृहाच्या भावना मी संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवीन. फक्त भावना पोहोचवू नका तर याप्रकरणी त्यांना दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करायला सांगा, असे उपसभापती कुरियन म्हणाले. त्यावर यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यास त्यांना सांगितले जाईल, असे नकवी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28056

Posted by on Apr 29 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (415 of 2453 articles)


मुंबई, [२८ एप्रिल] - मागील काही दिवसांपासून सूरू असलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र ...

×