Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » धडक मारणारे ते वाहन मंत्र्यांच्या ताफ्यातील नव्हते

धडक मारणारे ते वाहन मंत्र्यांच्या ताफ्यातील नव्हते

=मानव संसाधन मंत्रालयाचा खुलासा=
Ministry-of-Human-Resource-Developmentनवी दिल्ली, [७ मार्च] – केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना आता यमुना एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघाताच्या मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये स्मृती इराणी यांचे नाव आल्यामुळे ज्या वाहनाच्या धडकेत बाईकचालक डॉक्टरचा मृत्यू झाला, ते वाहन मानव संसाधन मंत्र्यांच्या ताफ्यातील नसल्याचा खुलासा मानव संसाधन मंत्रालयाने केला आहे.
शनिवारी रात्री वृंदावन येथे सुरू असलेल्या भाजयुमोच्या राष्ट्रीय संमेलनातून परत येत असताना स्मृती इराणी यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात स्मृती इराणी किरकोळ जखमी झाल्या होत्या. स्मृती इराणी यांच्या ताफ्यातील एका गाडीने एका मोटारसायकलला धडक दिली होती. या धडकेत मोटारसायकलवरील डॉक्टर आग्रानिवासी रमेश नागर यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांची दोन मुले जखमी झाली होती, असे याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. या अपघातातील जखमी लोकांना मदत न करता स्मृती इराणी घटनास्थळावरून निघून गेल्या, असा आरोप जखमींच्या कुटुंबीयांनी केला होता. यावर खुलासा करताना मंत्रालयाने म्हटले की, अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी स्मृती इराणी यांनी आग्राच्या पोलिस अधीक्षकांना फोन करून रुग्णवाहिका पाठवायला सांगितली होती. मात्र ज्या वाहनाने मोटरसायकलला धडक दिली ते वाहन मंत्र्यांच्या ताफ्यातील नव्हते.
अपघात झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी ट्विट करून, मी सुखरूप आहे. माझ्यासाठी चिंता आणि प्रार्थना करणार्‍यांना धन्यवाद. एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातामुळे अनेक गाड्या एकमेकांवर धडकल्या. यात माझी गाडी आणि पोलिसांची जिप्सीही होती. अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावे म्हणून मी प्रयत्न केले, असे म्हटले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27096

Posted by on Mar 7 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (742 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [७ मार्च] - आधुनिक ई-मेलचा शोध लावणारे अमेरिकेतील आयटी तज्ज्ञ ‘रे टॉमलिनसन’ यांचे शनिवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे ...

×