|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.32° C

कमाल तापमान : 30.43° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 64 %

वायू वेग : 3.63 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.43° C

Weather Forecast for
Thursday, 25 Apr

28.05°C - 31.3°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

28.12°C - 30.79°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.62°C - 30.6°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.38°C - 31.86°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.92°C - 33.1°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.22°C - 32.93°C

few clouds
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » धनगर आरक्षणास विरोध नाही

धनगर आरक्षणास विरोध नाही

=आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची स्पष्टोक्ती=
tribal_minister_vishnu_savraनाशिक, [८ जानेवारी] – धनगर समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. परंतु, आदिवासींसाठी असलेल्या सात टक्के आरक्षाणास धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी आम्ही कदापी सहन करणार नसल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केले. भाजपा आदिवासी प्रदेश आघाडीतर्फे रॉयल हेरिटेज हॉटेलमध्ये आयोजित सदस्य नोंदणी कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते.
पदाधिकार्‍यांची राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. राज्यभरातील एक कोटी २५ लाख अनुसूचित जमाती, आदिवासींची नोंदणीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असून ऑक्टोबर महिन्यापासून नोंदणीस प्रारंभ झाला. राज्यभरात अद्याप २४ लाख सदस्यांनी नोंदणी केली आहे.
विष्णू सावरा पुढे म्हणाले की, बुथनिहाय सदस्य नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी पदाधिकार्‍यांना सक्रिय राहण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच वन हक्क कायद्यान्वये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. आदिवासींना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यासाठी समन्वयकांची विभागनिहाय बैठक आदिवासी विकास विभाग घेत आहे. यात जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी खा. हरिश्‍चंद्र चव्हाण, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, भाजपा आदिवासी प्रदेश आघाडीचे संघटन मंत्री नाना नवले, माजी आमदार उमाजी बोरसे, राजेंद्र फडके, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, चिंतामण वनगा, नगरसेविका रंजना भानसी, आदिवासी प्रदेश आघाडीचे जिल्हाध्यक्ष परशुराम वाघेरे, संजय करीकुरे, सरचिटणीस रामचंद्र राऊत यांच्यासह आदिवासी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Posted by : | on : 9 Jan 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g