Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » धनादेश, कार्डचा वापर करा

धनादेश, कार्डचा वापर करा

=काळा पैसा रोखण्यासाठी जेटली यांचा सल्ला=
Arun-Jaitley3नवी दिल्ली, [२७ मार्च] – काळ्या पैशाचे उगमस्थानच बंद करण्यासाठी नागरिकांनी धनादेश आणि कार्डस्‌चा जास्तीत जास्त वापर करावा, असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शुक्रवारी येथे दिला.
भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करीत असल्याने काळ्या पैशात वाढ होण्याची शक्यताही जास्त बळावली आहे. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी रोख व्यवहार करण्यापेक्षा धनादेश आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्डस्‌च्या माध्यमातून आपले आर्थिक व्यवहार करायला हवे, असे मत जेटली यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमधील चलनाची किंमत फार जास्त आहे. त्या देशांमध्ये रोख व्यवहारांचे प्रमाण फार कमी आहे. पण, भारतात मोठ्या किमतींचे व्यवहार वगळता इतर सर्वच व्यवहार रोखीने केले जातात. यातूनच काळ्या पैशाचा उगम होण्याची दाट शक्यता असते. आपल्याला जर काळ्या पैशाचे उगमस्थान कायमचे बंद करायचे असेल, तर आपणही धनादेश किंवा कार्डस्‌च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यावर भर द्यायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21756

Posted by on Mar 28 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1841 of 2453 articles)


=फॉर्च्युनच्या यादीत सत्यार्थींचेही नाव, ओबामांना स्थान नाही= न्यूयॉर्क, [२७ मार्च] - फॉर्च्युन या विश्‍वविख्यात नियतकालिकाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या जगातील ५० ...

×