Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी त्रास सहन केला

धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी त्रास सहन केला

=कलाम यांचे शेवटचे शब्द=
DR_A_P_J_Abdul_Kalam3शिलॉंग, [२८ जुलै] – येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील कार्यक्रमात हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याच्या काही मिनिटे आधी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ताफ्याला सुरक्षा देणार्‍या एका सुरक्षा रक्षकाला, ‘धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी त्रास सहन केला,’ असे उद्‌गार काढले होते.
गुवाहाटी ते शिलॉंग या संपूर्ण मार्गात माझ्या सुरक्षेची काळजी घेताना तुम्ही किती त्रास सहन केला, याची मला जाणीव आहे, असे डॉ. कलाम या रक्षकाला म्हणाले, अशी माहिती पूर्व खासी हिल्सचे पोलिस अधीक्षक एम. खारक्रंग यांनी दिली.
विशेष म्हणजे, डॉ. कलाम यांनी या रक्षकाला इशार्‍यानेच बोलावल्यानंतर तो पुरता घाबरला. पण, नंतर कलाम यांनी त्याचे आभार मानले आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडले, अशी पावती दिल्यानंतर या सुरक्षा रक्षकाला आश्‍चर्याचा धक्का बसला. कलाम यांच्या कारपुढे असलेल्या ओपन जिप्सीत हा सुरक्षा रक्षक संपूर्ण प्रवासात खांद्यावर बंदूक घेऊन उभा होता. त्याचे चौफेर लक्ष होते. या सुरक्षा रक्षकाने सीटवर बसावे, असा संदेशही कलाम यांनी त्याला पाठविला. रेडिओ मॅसेजही दिला. पण, हा रक्षक बसला नाही. कलाम यांची काळजी घेण्यासाठी तो तसाच उभा राहिला. ताफा आयआयएमच्या परिसरात दाखल झाल्यानंतर कलाम यांनी आपल्या सहकार्‍यांना या सुरक्षा रक्षकाचा शोध घेण्यास सांगितले. काही वेळातच तो कलाम यांच्या जवळ आला. कलाम यांनी त्याला धन्यवाद देतानाच, माझ्यामुळे तुम्हाला बराच त्रास सहन करावा लागला, यासाठी खेदही व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23565

Posted by on Jul 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1535 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२८ जुलै] - २००५ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती असताना, पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल ...

×