Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » धरणातील गाळ काढण्यासाठी नवीन संयंत्राची खरेदी

धरणातील गाळ काढण्यासाठी नवीन संयंत्राची खरेदी

girish mahajanमंबई, [२२ एप्रिल] – राज्यातील विविध धरणातील साचलेला गाळ काढण्यासाठी राज्यात जिल्हा नियोजन समिती आणि यांत्रिकी विभागामार्फत एकूण ८४ कोटी १५ लक्ष रुपयांची २९७ संयंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. नाशिक येथील जलसंपदा यांत्रिकी विभागामार्फत घेण्यात आलेल्या नवीन संयंत्रांचे उद्घाटन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गंगापूर प्रकल्प क्षेत्रातील गंगावर्‍हे येथे करण्यात आले.
यावेळी महाजन म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी अडविणे आणि पाणी जिरविण्याची विविध कामे शासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सुरू केली आहेत. पाण्याअभावी मराठवाड्यातील अनेक गावात स्थलांतर होत असताना अशा भागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी नवीन धरण उभारणे अत्यंत खर्चिक काम आहे. धरण उभारण्याच्या केवळ १० ते २० टक्के खर्चात धरणातील गाळ काढून तेवढीच क्षमता निर्माण करणे शक्य असल्याने शासनाने धरणातील गाळ काढण्याच्या कामांना मान्यता दिली, असे त्यांनी सांगितले.
उद्योजक आणि विविध स्वयंसेवी तसेच सेवाभावी संस्थांनी लोकसहभाग दिल्यास पुढच्यावर्षी अधिक पाणीसाठा उपलब्ध होईल. नाशिकसाठी ८ यंत्र देण्यात आले असून मागणीनुसार यंत्रांची संख्या वाढविण्यात येईल. गरज भासल्यास यंत्र भाड्यानेदेखील घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. शेतीसाठी धरणातील गाळ उपयुक्त असून शेतकर्‍यांनी अधिकाधिक गाळ वाहून न्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यंत्र खरेदी करताना विविध संस्थांशी चर्चा केल्याने सुमारे ६ कोटींची बचत झाल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात जिल्हा नियोजन समिती आणि यांत्रिकी विभागामार्फत एकूण ८४ कोटी १५ लक्ष रुपयांची २९७ संयंत्रे खरेदी करण्यात येणार असून त्यापैकी यांत्रिकी विभागामार्फत ५० कोटींची १७८ संयंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. एकूण ४१ संयंत्रे प्राप्त झाली असून लवकरच १३६ संयंत्रे प्राप्त होणार आहेत. राज्यातील २२ जिल्ह्यात विविध प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी गरजेनुसार यंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी ६ संयंत्रे खरेदी करण्यात येणार असून त्यापैकी ४ प्राप्त झाली आहेत. गंगापूर धरणातील गाळ काढण्यासाठी गरजेनुसार यांत्रिकी विभागामार्फत देखील अधिकची संयंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27944

Posted by on Apr 23 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (451 of 2451 articles)


=१४ हजार किमीची अचूक मारक क्षमता= बीजिंग, [२२ एप्रिल] - केवळ अमेरिकाच नाही, तर अनेक देशांच्या आतपर्यंत मारा करणार्‍या सर्वांत ...

×