Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » धार्मिक तिरस्कार कदापि मान्य नाही

धार्मिक तिरस्कार कदापि मान्य नाही

=पंतप्रधानांचा स्पष्ट इशारा=
narendra-modi4नवी दिल्ली, [१७ फेब्रुवारी] – राजधानी दिल्लीतील चर्चवर अलीकडील काळात झालेल्या हल्ल्यांप्रकरणी प्रथमच आपले मौन तोडताना, ‘सर्वधर्म समभाव’ अशी ओळख असलेल्या या देशात धार्मिक तिरस्कार निर्माण करण्याचा कुठलाही प्रयत्न कदापि मान्य केला जाणार नाही. धार्मिक हिंसाचार पसरविणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,’ असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी दिला.
गेल्या तीन महिन्यांच्या काळात दिल्लीतील पाच चर्च आणि एका ख्रिश्‍चन शाळेवर हल्ले करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर विरोधकांनी पंतप्रधानांवर टीकेची झोड उठविली असतानाच, पंतप्रधानांनी उपरोक्त शब्दात कडक इशारा दिला आहे. ‘सर्व धर्मांचा समान सन्मान’ हेच आपल्या सरकारचे धोरण आहे. भारतात सर्वधर्मीयांना परिपूर्ण स्वातंत्र्य मिळेल. तसेच कुठल्याही प्रभावात न येता कुणीही कुठल्याही धर्माचा स्वीकार करू शकेल, असेच पोषक वातावरण निर्माण करण्याचा आपल्या सरकारचा निर्धार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कुरियाकोस ऊर्फ कॅव्हरा आणि मदर युफ्रासिया यांना संत पदवी प्रदान करण्यासाठी विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान संबोधित करीत होते.
जातीय हिंसाचाराला प्रोत्साहन देणार्‍यांना निर्वाणीचा इशारा देताना पंतप्रधान म्हणाले की, कुठल्याही स्थितीत कोणत्याही धर्माविरोधातील हिंसाचार आपले सरकार कदापि मान्य करणार नाही. अशा हिंसक घटनांचा मी आणि माझे सरकार नेहमीच निषेध करेल. संपूर्ण जगात धर्माच्या नावाखाली समाजाचे विभाजन सुरू आहे. हा जागतिक चिंतेचा विषय आहे, याकडे लक्ष वेधताना, सर्व धर्मांचा सन्मान करा, परस्परांचा आदर करा, ही भारताची प्राचीन परंपरा आता संपूर्ण जगात अंमलात आणण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आज आपले जग अशा वळणावर उभे आहे, जिथे योग्य मार्गाची निवड जर केली नाही, तर आपण सर्वच अतिशय गडद अशा अंधकारात ढकलले जाऊ शकतो. उद्या आपण तिसर्‍या सहस्त्रकात प्रवेश केला तरीही जातीय सलोख्याची जी भावना भारतात आहे, ती जगात कोणत्याही देशाकडे राहू शकणार नाही. यावेळी पंतप्रधानांनी महात्मा गांधी आणि तथागत गौतम बुद्धांच्या कार्याचे स्मरण केले आणि ‘सर्वधर्म समभाव’ ही भावना प्रत्येक भारतीयाच्या ‘डीएनए’मध्येच असायला हवी, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20658

Posted by on Feb 18 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2050 of 2453 articles)


=भिंतीवर लिहिले ‘गेट आऊट’= वॉशिंग्टन, [१७ फेब्रुवारी] - भारतासह जगभरातील भारतीय नागरिक महाशिवरात्रीचे पावन पर्व मोठ्या भक्तिभावाने साजरे करीत असतानाच, ...

×