Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » धूम्रपानामुळे कर्करोग होतो, पुरावा काय?

धूम्रपानामुळे कर्करोग होतो, पुरावा काय?

=सुप्रीम कोर्टाचा सवाल, केंद्राकडून मागविले उत्तर=
supreme_court_1नवी दिल्ली, [९ मार्च] – धूम्रपान केल्याने किंवा तंबाखूजन्य उत्पादकांचे सेवन केल्याने कर्करोग होतो, हे सिद्ध करणारा काही पुरावा आहे काय, असा सवाल उपस्थित करीत, पुरावा असल्यास तो सादर केला जावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
सिगारेटची पाकिटे आकर्षक नसणारी आणि साधी बनविण्यात यावी, अशी विनंती करणार्‍या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्या. उदय ललित यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने उपरोक्त प्रश्‍न उपस्थित केला. धूम्रपान केल्यामुळेच कर्करोग होत असल्याच्या दावा पुराव्यांसह सिद्ध करता येऊ शकतो का, अशी विचारणाही न्यायालयाने केली.
अनेक नागरिक धूम्रपान करीत नाहीत, पण त्यांना कर्करोग झाल्याची आणि यातील अनेकांचा मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे अनेक नागरिक असे आहेत की, जे नेहमी धूम्रपान करतात आणि तंबाखूचेही सेवन करतात; पण त्यांना काहीच होत नाही. त्यांची प्रकृती अगदीच ठणठणीत आहे, याकडेही न्यायालयाने केंद्र सरकारचे लक्ष ओढले आणि धूम्रपानामुळे खरच कर्करोग होतो काय, हे पुराव्यासह स्पष्ट करणारा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.
अलाहाबाद येथील वकील उमेश नारायण शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सिगारेटची पाकिटे आकर्षक असल्याने युवा वर्ग त्याकडे आकर्षित होतो. या पाकिटांवर लिहिण्यात आलेल्या सूचनेकडेही नागरिक दुर्लक्ष करतात. त्यामुळे सिगारेटची पाकिटे आकर्षक नसावी आणि साधी व कमी रंग वापरलेली असावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27173

Posted by on Mar 10 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (715 of 2453 articles)


=कॅगच्या अहवालात ठपका= नवी दिल्ली, [९ मार्च] - केंद्रात कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकार सत्तेवर असताना देशातील सहा प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी ४६ ...

×