Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ध्यानचंदला भारतरत्न द्या

ध्यानचंदला भारतरत्न द्या

=राज्यसभेत सदस्याची मागणी=
rajyasabhaनवी दिल्ली, [१७ मार्च] – हॉकीचा जादूगर अशी ओळख असलेला ध्यानचंद आणि बसपाचे संस्थापक काशीराम यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी मंगळवारी राज्यसभेत करण्यात आली. दिलीपकुमार तिर्के आणि बसपाचे नरेंद्रकुमार कश्यप यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. १८५ सामन्यात ५७० गोल करण्याचा विश्‍वविक्रम त्यांच्या नावावर आहे. दोन ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वात जास्त गोलचा विक्रम देखील त्यांनी नोंदविला आहे. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत ध्यानचंद यांच्या खेळाने प्रभावित झालेल्या हिटलरने जर्मन सैन्यात त्यांना कर्नलचे पद देऊ केले होते. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत दोन मेट्रो स्थानकांना ध्यानचंद यांचे नाव देण्यात आल्याचे दिलीपकुमार तिर्के यांनी सांगितले. २६ ऑगस्टला ध्यानचंद यांचा जन्मदिवस ‘खेळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. २० व्या शतकातील ते महान खेळाडू असल्याने त्यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी तिर्के यांनी केली.
बसपाचे कश्यप यांनी पक्षाचे संस्थापक काशीराम यांना जातविरहित समाजनिर्मितीसाठी केलेल्या कार्यासाठी सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी केली. काशीराम यांनी अनुसूचित जाती, जनजातीला आरक्षण मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य केल्याचे आणि शैक्षणिक संस्थेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळवून दिल्याचे सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21534

Posted by on Mar 18 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1890 of 2453 articles)


=अमेरिकेने दिले पाकला ठोस पुरावे= वॉशिंग्टन, [१७ मार्च] - २६/११ रोजीच्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा सर्वोच्च कमांडर ...

×