Home » कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य » नंदन नीलेकणी काँग्रेस सोडणार

नंदन नीलेकणी काँग्रेस सोडणार

=प्राथमिक शिक्षणाच्या प्रचारावर भर=
NANDAN_NILEKANIबंगळुरू, [२७ जून] – नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव पुढे करण्यात आलेले आधार कार्ड प्रकल्पाचे प्रणेते आणि प्रख्यात उद्योगपती नंदन नीलेकणी यांना राजकारणाचा कंटाळा आला असून, त्यांनी आता राजकारणासोबतच कॉंगे्रस पक्षालाही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आपले पुढील आयुष्य प्राथमिक शिक्षणाचा प्रचार व प्रसारासाठी खर्ची करण्याचे त्यांनी ठरविले आहे.
गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात नीलेकणी यांनी कॉंगे्रसमध्ये प्रवेश केला होता. पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव चर्चेत होते. कॉंग्रेस क्षाने त्यांना दक्षिण बंगळुरूमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. पण, भाजपा नेते अनंतकुमार यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. यानंतर कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या कोणत्याही नेत्याने नीलेकणी यांची साधी दखलही घेतली नाही. कॉंग्रेसने आपला केवळ वापर केला असल्याचे त्यांना लक्षात आले असल्याने त्यांनी कॉंगे्रस आणि राजकारण दोघांनाही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
स्वत: नीलेकणी यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी ‘इक स्टेप’ या उपक्रमाच्या माध्यमातून ५ ते १२ वयोगटातील मुलांना वाचन व तंत्रज्ञानाच्या मदतीने गणित कसे शिकायचे, याचे धडे ते देणार आहेत. स्मार्टफोन व मोबाईलवर सहज उपलब्ध होईल आणि मुलांना कुठेही राहून त्याचा वापर करता येईल, असे शिक्षणाचे तंत्रज्ञान शोधून काढणे हा ‘इक स्टेप’चा उद्देश आहे. हे तंत्रज्ञान आजच्या शैक्षणिक माध्यमात महत्त्वाची भर घालेल, असा विश्‍वास नीलेकणी यांना आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23106

Posted by on Jun 28 2015. Filed under कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य (1601 of 2452 articles)


=१५ दिवसात मागितले उत्तर= लखनौ, [२७ जून] - दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पार्टीच्या बोधचिन्हाचे (लोगो) प्रारूप तयार करणारे सुनील ...

×