Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नक्षल्यांच्या कांगारू कोर्टाने दिला ५३ जणांना मृत्युदंड

नक्षल्यांच्या कांगारू कोर्टाने दिला ५३ जणांना मृत्युदंड

=गृह मंत्रालयाची धक्कादायक माहिती=
NAXALनवी दिल्ली, [१३ मार्च] – देशातील पाच सर्वाधिक नक्षलप्रभावित राज्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कांगारू कोर्टाने गेल्या तीन वर्षांच्या काळात एकूण ५३ लोकांना मृत्युदंड दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सांख्यिकी विभागाने ही धक्कादायक माहिती दिली. यातील १५ जणांना २०१५ मध्ये पोलिसांचा खबर्‍या असण्याच्या आरोपात किंवा नक्षली विचारधारेवर अविश्‍वास ठेवल्याप्रकरणी कांगारू कोर्ट किंवा नक्षल्यांच्या जन अदालततर्फे मृत्युदंड देण्यात आला, असे यात नमूद आहे.
२०१५ मध्ये नक्षल्यांनी पाच राज्यांमध्ये एकूण ४१ जन अदालती भरविल्या होत्या. यात आंध्रप्रदेश (१), बिहार (६), छत्तीसगड (१४), झारखंड (१४) आणि ओडिशातील (६) जनअदालतींचा समावेश आहे.
त्यापूर्वी, २०१४ मध्ये या पाच राज्यांमध्ये ५४ जनअदालती भरविण्यात आल्या होत्या आणि त्यात १५ जणांना मृत्युदंड देण्यात आला. त्याचप्रमाणे २०१३ मध्ये एकूण ६३ जनअदालतींच्या माध्यमातून २० लोकांना मृत्युदंड देण्यात आला होता, असेही यात म्हटले आहे.
नक्षलप्रभावित राज्यांत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी नक्षली नेते नक्षली विचारधारेवर विश्‍वास न ठेवणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारची शिक्षा ठोठावत असतात. त्यांच्यावर पोलिसांचा खबर्‍या होण्याचा आरोपही ठेवला जातो. या कांगारू कोर्टला प्रजा न्यायालय असेही म्हटले जाते.
२०१६ मध्ये १५ फेबु्रवारीपर्यंत नक्षली नेत्यांनी छत्तीसगडमध्ये एकूण दोन जनअदालतींचे आयोजन केले आहे, असेही अहवालात नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27273

Posted by on Mar 14 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (676 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१२ मार्च] - आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या जगभरातील अनुयायांची यावेळी निसर्गाने ...

×