Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नटराजन यांनी हाताळलेल्या फाईल्सची समीक्षा करू

नटराजन यांनी हाताळलेल्या फाईल्सची समीक्षा करू

=केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन=
javdekar prakash 2नवी दिल्ली, [३० जानेवारी] – महत्त्वाच्या व संवेदनशील प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी आपल्यावर ‘बाह्य दबाव’ होता, या माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या आरोपाची आपण गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी हाताळलेल्या सर्व फाईल्सची आपण समीक्षा करू, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
माजी पर्यावरण मंत्री म्हणतात, त्याप्रमाणे कुठल्या बाह्य दडपणाचा उल्लेख फाईल्समध्ये होता का, याची तपासणी आपले मंत्रालय करेल, असेही त्यांनी नमूद केले. जयंती नटराजन यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रातून केलेला खुलासा आज सार्वजनिक झाला आहे, ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे, असेही जावडेकर म्हणाले. माजी पर्यावरण मंत्र्यांनी बाह्य दबावाचा आरोप केला आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांच्या फाईल्सची समीक्षा करणे, हे पर्यावरण मंत्री म्हणून आपले कर्तव्यच आहे, असेही त्यांनी सांगितले. मी निश्‍चितच ‘त्या’ सर्व फाईल्सची समीक्षा करीन आणि नेमकी वस्तुस्थिती जाणून घेईन, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले

Short URL: https://vrittabharati.in/?p=20185

Posted by on Jan 31 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2143 of 2453 articles)


मुंबई, [३० जानेवारी] - सरकारचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे ...

×