Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » नद्या जोड प्रकल्प राबविणारच : व्यंकय्या नायडू

नद्या जोड प्रकल्प राबविणारच : व्यंकय्या नायडू

Venkaiah-Naidu_3नवी दिल्ली, [१३ जानेवारी] – काहीही झाले तरी भाजपाप्रणीत रालोआचे केंद्र सरकार नद्या जोडणी प्रकल्प राबविणारच, असा निर्धार केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला असून, यामधील अडचणींवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढू किंवा त्या दूर करू, असेही स्पष्ट केले आहे.
नद्या जोडणी प्रकल्प राबविण्याबाबत आमचे काही पर्यावरण मित्र चिंता व्यक्त करीत आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे विरोध हा होणारच. परंतु, त्याची उत्तरेही आमच्याकडे आहेत. काहीही झाले तरी आम्ही प्राधान्याने नद्यांना जोडणार, असे व्यंकय्या नायडू यांनी ‘भारत जल सप्ताह’ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. देशात नद्या जोडणी योजना ही एक लोकचळवळ व्हावी यासाठी वातावरण निर्मिती करण्याची गरजही नायडू यांनी व्यक्त केली.
नद्या जोडणी प्रकल्पामुळे समुद्री जीवनाला धोका निर्माण होईल आणि ही बाब जल विज्ञान परिस्थितीशी अनुकूल नाही, असे अनेक पर्यावरणवाद्यांचे मत आहे. आज विकसित देश भाषणे देऊन आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आधी आम्हालाही विकसित व्हावे लागेल. त्यानंतर आम्ही इतरांना मार्ग दाखवू, असेही नायडू यावेळी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19691

Posted by on Jan 14 2015. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2238 of 2453 articles)


लष्करप्रमुख सुहाग यांचा आरोप २०१४ मध्ये ११० अतिरेक्यांचा खात्मा चीन सीमेवर शांतता नवी दिल्ली, [१३ जानेवारी] - स्वत:च्या भूमीवर ...

×