Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » नरेंद्र मोदींकडे विकासाची दूरदृष्टी

नरेंद्र मोदींकडे विकासाची दूरदृष्टी

=सरन्यायाधीशांचेही मत=
justice h. l. dattuनवी दिल्ली, [१० जानेवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय चांगले नेते तर आहेतच, शिवाय त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टीही आहे, अशा शब्दात सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी आज पंतप्रधानांच्या कार्यशैलीची स्तुती केली.
आतापर्यंत केंद्रात स्थानापन्न होणारे प्रत्येकच सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या प्रखर टीकेचे लक्ष्य ठरत आले आहे. पण, प्रथमच स्वत: सरन्यायाधीशांनी मोदी यांची स्तुती केल्याने सरकार व न्यायव्यवस्था यांच्यात चांगले संबंध असल्याची पुष्टीच मिळते. पंतप्रधान मोदी यांची आतापर्यंत मी चार वेळा भेट घेतली. ते अतिशय स्पष्टवक्ते आहेत. भारतीय न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्यात चांगले संबंध असल्याचे मी विश्‍वासाने सांगू शकतो, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.
सत्तेत आल्यानंतर मोदी यांनी आपल्या विकासात्मक दृष्टीचा वापर करून अनेक देशांना जिंकले आहे. गेल्या सहा महिन्यांच्या काळात त्यांनी विकासाला बरीच चालना दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19541

Posted by on Jan 11 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2263 of 2453 articles)


=शस्त्र, स्फोटकांसह महिला दहशतवादी फरार= पॅरीस, [१० जानेवारी] - येथील प्रख्यात व्यंग्यचित्र साप्ताहिक चार्ली एब्दोवर हल्ला करून १० जणांना ठार ...

×