Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नरेंद्र मोदींची लाट कायम

नरेंद्र मोदींची लाट कायम

=निवडणुका झाल्यास रालोआचे पुन्हा त्रिशतक: ताज्या अभ्यासातील निष्कर्ष=
narendramodi-pmनवी दिल्ली, [२७ जानेवारी] – दादरी येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेससह काही विरोधकांनी व साहित्यिकांनी देशात असहिष्णुता असल्याचे चित्र रेखाटून केंद्रातील भाजपाप्रणीत सरकारला बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला, तरी देशात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट कायम असल्याचे एका ताज्या अभ्यासावरून दिसून आले आहे.
मोदी सरकारचे काम अतिशय चांगले किंवा खुपच चांगले असल्याचे मत सुमारे ४६ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे. तर, ५४ टक्के नागरिकांनी मोदी सरकारचे काम उत्तम असल्याचे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी हे सरकारपेक्षाही कितीतरी श्रेष्ठ असल्याचेही अनेक नागरिकांनी सांगितले. अर्थात सरकारच्या एकूण कामगिरीच्या तुलनेत एकट्या नरेंद्र मोदी यांची कामगिरी अधिक चांगली असल्याचे या नागरिकांचे मत आहे.
नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिलेल्या बहुतांश वचनांची पूर्तता केली आहे. आजवरच्या सरकारच्या तुलनेत या सरकारचे काम खरोखरच चांगले असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ६२ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दिली आहे. तर, केवळ ११ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना आणि ४ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दर्शविली.
मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत रालोआने ३३९ जागांवर विजय मिळविला होता. सध्या विरोधी पक्षांनी देशात मोदी सरकारविरोधात वातावरण निर्माण केले आहे. या स्थितीत जर आता निवडणुका घेण्यात आल्या, तर रालोआला किमान ३०१ जागा मिळतील, असा अंदाज आहे. याचाच अर्थ रालोआ पुन्हा एकदा जागांचे त्रिशतक मारणार आहे. सध्या कॉंगे्रसप्रणीत संपुआच्या एकूण ६२ जागा आहेत. त्या वाढून हा आकडा १०८ पर्यंत जाईल आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या मतांमध्ये चार टक्क्यांची वाढ होईल, असा निष्कर्षही या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26670

Posted by on Jan 28 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (871 of 2453 articles)


राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घेतली सलामी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद प्रमुख पाहुणे राजपथावर उसळला जनसागर, अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था नवी ...

×