नरेंद्र मोदींची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर
Saturday, September 19th, 2015=कॉंगे्रसजनांनाही पडली भुरळ, सर्वेक्षणातील वास्तव=
नवी दिल्ली, [१८ सप्टेंबर] – केंद्रातील सत्ता गेल्याने निराश झालेला कॉंगे्रस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठवित असला, तरी या टीकेचा नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट, त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. सर्वसामान्य जनताच नव्हे, तर चक्क कॉंगे्रसच्या नेत्यांनाही मोदी यांनी आपल्या कार्यपद्धतीमुळे भुरळ पाडली आहे.
‘प्यु रिसर्च फाऊंडेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेबाबत अलीकडेच पाहणी केली. यात, मोदी यांच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत असून, त्यांचे रेटिंग ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचले असल्याचे दिसून आले आहे. ६ एप्रिल ते १९ मे या कालावधीत करण्यात आलेल्या या अभ्यासात एकूण २४५२ नागरिकांचे मत विचारात घेण्यात आले.
गेल्या वर्षी मे महिन्यात नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सत्तेची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून त्यांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला आणि लोकहितार्थ जी धोरणे राबविली, त्यास बहुतांश देशवासीयांनी पसंती दिली, असे प्यु रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.
या अभ्यासात कॉंगे्रस नेत्यांनाही सहभागी करून घेण्यात आले. प्रत्येक १० पैकी ६ समर्थकांनी नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या शौचालय बांधकाम, बेरोजगारांना रोजगार, महागाईवर नियंत्रण, तसेच गरिबांच्या कल्याणकारी योजना अतिशय उत्तम असल्याचे नमूद केले. ५६ टक्के कॉंगे्रसजनांना दहशतवादाविरोधात मोदी सरकारने छेडलेली मोहीम अतिशय योग्य आणि प्रभावी असल्याचे वाटते. मोदी यांची भ्रष्टाचारविरोधी मोहीमही कॉंगे्रसजनांना भुरळ पाडून गेली आहे. देशाच्या शहरी भागात मोदींना ८३ टक्के आणि कॉंगे्रसला ५२ टक्के, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात अनुक्रमे ८९ व ६४ टक्के गुण मिळाले आहेत. एकीकडे मोदी यांची लोकप्रियता वाढत असताना, सुरुवातीच्या पाच महिन्यांच्या काळात देशात जातीय हिंसाचाराच्या घटनाही वाढल्या असल्याचे दिसून आले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=23890

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!