Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नरेंद्र मोदींनी आईचा अपमान केला

नरेंद्र मोदींनी आईचा अपमान केला

=कॉंग्रेसची टीका=
Anand-Sharmaनवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] – रविवारी फेसबुकच्या कार्यक्रमात आईचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. परंतु, यामुळे कॉंग्रेसचा चांगलाच तिळपापड झाला असून, नरेंद्र मोदी यांचे भावुक होणे म्हणजे नाटक असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.
याबाबत बोलताना पक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले की, आईला कुणाच्या घरी जाऊन भांडी घासण्याचे काम करावे लागावे, एवढे नरेंद्र मोदी गरीब नव्हते. पंतप्रधानांनी आईबद्दल जे उद्‌गार काढले ते खोटे असून, त्यांनी आईचा अपमान केला आहे, असे सांगत आनंद शर्मा म्हणाले की, आपल्या शपथविधी समारंभाला पंतप्रधानांनी आपल्या आईला बोलावले नव्हते. त्यामुळे परदेशात जाऊन रडण्याऐवजी मोदी यांनी जबाबदार पुत्र बनावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भ्रष्टाचारच्या आरोपांनाही शर्मा यांनी प्रत्युत्तर दिले. परदेशात जाऊन स्वतःचा प्रचार करणार्‍या मोदींची मानसिकता तपासली पाहिजे. मोदींच्या परदेश दौर्‍याचा गैरवापर होत असून, मोदी आणि भाजपाच्या प्रचारासाठीच जनतेच्या पैशांचा चुराडा केला जात असल्याचाही आरोप शर्मा यांनी केला.
सातत्याने गरिबांच्या कल्याणाची भाषा करणार्‍या मोदींनी आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि आसाममधील पूरग्रस्तांची साधी विचारपूसही केली नाही. गरिबांसाठीच्या सर्व योजनांना मोदी सरकारने कात्री लावल्याचा घणाघातही शर्मा यांनी यावेळी केला आहे. मोदींनी राजकारण अत्यंत हिन पातळीवर आणून ठेवले असून, त्यांना शालीनतेचा गंधही नाही, अशी टीकाही शर्मा यांनी केली.
दरम्यान कॉंग्रेसच्या या प्रतिक्रियेवर भाजपा नेते संबित पात्रा यांनी, आनंद शर्मा यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने पंतप्रधानांच्या आईला गलिच्छ राजकारणात ओढणे, ही दुर्दैवी बाब असल्याचे म्हटले आहे.
कॅलिफोर्नियातील सॅप सेंटर येथे उपस्थित भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणातून गांधी घराण्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर बोलताना कॉंग्रेस नेते राशीद अल्वी यांनी, मोदींनी कॅलिफोर्नियात जाऊन केलेल्या आपल्या भाषणातून देशवासीयांची थट्टा करून केवळ स्वत:चा उदो उदो केल्याचे सांगत ते भाषण ऐकून मला लाज वाटली, असे म्हटले आहे. शिवाय मोदी आईची काळजी का घेत नाहीत? स्वत:च्या आईचीही काळजी घेऊ शकत नाही इतका कमी पगार मोदींना आहे का, असे प्रश्‍न उपस्थित करून राशीद अल्वी यांनी मोदी ढोंगी असल्याचा हल्लाबोल केला.
एकामागोमाग एक घोटाळे बाहेर आलेल्या राजस्थान सरकारचे उदाहरण देत दुसर्‍यांवर टीका करण्याआधी मोदींनी स्वत:च्या पक्षाकडे पाहावे, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी मोदींवर शरसंधान साधले.
जदयू नेते त्यागी
आईवरून मोदींच्या डोळ्यांत अश्रू तरळल्यावरून प्रतिक्रिया देताना जदयू नेते के. सी. त्यागी यांनीही कॉंग्रेस नेत्यांच्या सुरात सूर मिसळून, मग मोदी स्वत:च्या आईसोबत का राहत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24103

Posted by on Sep 29 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1394 of 2453 articles)


=एम. जे. अकबर यांचा घणाघात= नवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आईवरील प्रेम निव्वळ देखावा असल्याचा आरोप ...

×