नरेंद्र मोदी न आल्याने दु:खी झालो
Wednesday, March 18th, 2015=मालदीवची प्रतिक्रिया=
नवी दिल्ली, [१७ मार्च] – गेल्या आठवड्यात तीन देशांचा दौरा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला भेट दिली नाही, याचे आम्हाला फार जास्त दु:ख आहे, अशी प्रतिक़्रिया या देशाने व्यक्त केली. माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशीद यांना कारावास ठोठावण्याच्या घडामोडीवर भारताने व्यक्त केलेल्या चिंतेचे निराकरण करण्याचा प्रयत्नही मालदीवने केला.
नाशीद यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर भारतासह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली. याबाबत विचारणा केली असता मालदीवच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या उपमंत्री फातिमा इनाया म्हणाल्या की, जे काही झाले, ते कायद्याच्या चौकटीतच झाले आणि ही बाब शुद्ध देशांतर्गत आहे. भारताची चिंता आम्ही समजू शकतो. आपल्या शेजारील देशात जर मोठी घडामोड घडत असेल, तर चिंता होणे स्वाभाविकच आहे. विशेषत: पंतप्रधान मोदी यांनी शेजारील देशांसोबतच्या संबंधांना विशेष महत्त्व दिले असताना भारताची चिंता योग्यच आहे. त्यांच्या चिंतेचे आम्ही लवकरच निराकरण करू, असे सांगताना, मोदी यांनी आमच्या देशाला भेट दिली नाही, याचे दु:ख आम्हाला आहे, असे त्या म्हणाल्या.
Short URL: https://vrittabharati.in/?p=21523

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!