Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » नरेंद्र मोदी, पर्रीकरांना इसिसची धमकी

नरेंद्र मोदी, पर्रीकरांना इसिसची धमकी

=गोवा पोलिसांना मिळाले पत्र=
modi-parikarपणजी, [१९ जानेवारी] – भारतात आपली पाळेमुळे मजबूत करण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या इसिस या जहाल दहशतवादी संघटनेने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
इसिसच्याच एका नेत्याची स्वाक्षरी असलेले एक पत्र गोवा पोलिसांना प्राप्त झाले असून, ते राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना पाठविण्यात आले आहे. तर, या पत्राची शहानिशा करण्यासाठी हे प्रकरण गोवा दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
गोवा सचिवालयाला गेल्या शनिवारी हे पत्र मिळाले. याबाबतची सूचना मिळताच पोलिसांनी लगेच हालचाली सुरू केल्या आणि पत्र नेमके कुठून आले व कुणी पाठविले, याचा शोध घेण्यासाठी विविध पथके गठित केली. पत्र लिहिणारा आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात आलेला असेल, असे अधिकार्‍याने सांगितले.
या पत्राच्या शेवटी इसिस असा उल्लेख असून, त्यावर स्वाक्षरीही आहे. सोबतच, देशात गौहत्येवर बंदी घालणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय संतापजनक असल्याने त्यांना व संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना ठार मारण्याचा आमचा निर्धार असल्याचे नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26595

Posted by on Jan 20 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (888 of 2453 articles)


मुंबई, [१९ जानेवारी] - व्हॉट्सऍपने या वर्षापासून वार्षिक सदस्यता शुल्क बंद करण्याचा निर्णय घेत ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत स्वरूपात ते उपलब्ध ...

×