Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » नरेंद्र मोदी स्वतंत्र भारतातील सर्वोत्तम नेते

नरेंद्र मोदी स्वतंत्र भारतातील सर्वोत्तम नेते

=रुपर्ट मरडॉक यांची स्तुतिसुमने=
rupert-mardokन्यूयॉर्क, [२५ सप्टेंबर] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारतातील सर्वोत्तम नेते आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता आल्यानंतर त्यांनी आर्थिक आघाडीवर महत्त्वाची धोरणे राबवितानाच प्रशासनातही व्यापक फेरबदल केले आहेत, अशा शब्दात येथील प्रसारमाध्यम क्षेत्रात माध्यमसम्राट म्हणून नावलौकिक असलेले प्रख्यात उद्योगपती रुपर्ट मरडॉक यांनी नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या आर्थिक विकासाकरिता अवघ्या सव्वा वर्षाच्या काळात जी धडक पावले उचलली आहेत, ती विलक्षण आणि जलद प्रतिसाद देणारी अशीच आहे. तथापि, आर्थिक विकासाला प्रचंड गती देण्यासाठी आणखी काही सुधारणा राबविण्याची आवश्यकता आहे, असे मतही मरडॉक यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी यांनी न्यूयॉर्कमधील वॉल्डार्फ एस्टोरिया हॉटेलमध्ये निवडक उद्योगपतींशी संवाद साधला. यावेळी मरडॉक हेदेखील उपस्थित होते. त्यांनी मोदी यांची भेट घेऊन आर्थिक मुद्यांवर सविस्तर चर्चाही केली. यानंतर मरडॉक यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे सर्वोत्तम नेते आहेत. भारताच्या विकासासाठी त्यांनी जी काही वचने दिली, त्यांच्या पूर्ततेसाठी पाऊल उचलण्यासाठी त्यांनी जराही वेळ घालविला नाही. आज जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये मोदी यांची लोकप्रियता पाहायला मिळत आहे. ते ज्या देशात जातात, तिथे त्यांना तेथील बलाढ्य नेत्यांपेक्षाही जास्त लोकप्रियता मिळत आहे. आजवरच्या इतिहासात असे कधीच झाले नाही.
‘अर्नेस्ट ऍण्ड यंग’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क वेनबर्जर यांनी म्हटले आहे की, विकासाबाबत आम्हाला चिंता आहे. आम्हाला अधिक सुधारणा हवी आहे. तिथेच दुसरीकडे ऊर्जा, जीएसटी व कररचनेबाबत सरकार सकारात्मक पावले उचलत आहे आणि ही समाधानाची बाब आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24059

Posted by on Sep 26 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1411 of 2458 articles)


=खरेदी प्रक्रिया पूर्ण= लंडन, [२५ सप्टेंबर] - १९२० च्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थी दशेत लंडन येथील ज्या घरात ...

×