Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नरेंद्र मोदी हे धर्मनिरपेक्ष नेते

नरेंद्र मोदी हे धर्मनिरपेक्ष नेते

=हाशिम अन्सारी यांची कबुली, कोणाच्याही बोलण्याने प्रभावित होत नाही=
hashim-ansari-RAM MANDIR, BABRI MASJIDनवी दिल्ली, [८ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरोखरच धर्मनिरपेक्ष नेते आहेत. राममंदिरासारख्या विषयावर भाजपाच्या लहान-सहान नेत्यांनी कितीही प्रक्षोभक वक्तव्ये केली, तरी मोदी यांच्या मनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही, अशी प्रांजळ कबुली अयोध्या वादातील सर्वात वयोवृद्ध प्रतिवादी हाशिम अन्सारी यांनी दिली आहे.
भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या कार्यकाळातच अयोध्येत राममंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, अशा स्वरूपाची वक्तव्ये भाजपा आणि अन्य संघटनांच्या नेत्यांनी अलीकडील काळात केली आहेत. याच पार्श्‍वभूमीवर अन्सारी यांनी उपरोक्त मत व्यक्त केले आहे. राममंदिर मुद्यावर जे नेते वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत, ते मूर्ख असून, त्यांना भारतातील कायद्यांविषयीची परिपूर्ण माहिती नसल्याचेच यावरून दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी देशाला स्थिर आणि मजबूत सरकार दिले आहे. कुणीही या सरकारची दिशाभूल करू शकत नाही. नरेंद्र मोदी हे धर्मनिरपेक्ष नेते आहेत आणि अशा नेत्यांच्या कोणत्याही वक्तव्याचा त्यांच्यावर परिणाम झालेला नाही व होणारही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अन्सारी यांनी यापूर्वी अयोध्या वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे म्हटले आहे, हे विशेष!

Short URL: https://vrittabharati.in/?p=22756

Posted by on Jun 9 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1648 of 2453 articles)


=थेरोरिस्ट यांचा दावा= न्यूयॉर्क, [८ जून] - येत्या सप्टेंबर महिन्यात संपूर्ण जगाचा शेवट होईल, असा सिद्धांत जगात दहशत निर्माण करण्याच्या ...

×