Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नवे नियम ३१ जुलैपर्यंत स्थगित

नवे नियम ३१ जुलैपर्यंत स्थगित

=उच्चशिक्षणासाठीही मिळणार पीएफ=
EPFO-Indiaनवी दिल्ली, [१९ एप्रिल] – भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याबाबतच्या नव्या नियमांमुळे नोकरदार वर्गाचा रोष ओढविल्यानंतर केंद्र सरकारने प्रस्तावित नियम काही प्रमाणात शिथिल करून पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढण्याचा कालावधी तीन महिन्यांनी वाढविला आहे. सोबतच, वैद्यकीय उपचार, घरखरेदी, विवाहाप्रमाणेच आता मुलांच्या उच्चशिक्षणासाठीही खातेधारक आपला पीएफ काढू शकणार आहेत.
पीएफबाबत नव्या नियमाची माहिती देणारी अधिसूचना फेबु्रवारीत जारी करण्यात आली होती. सुरुवातीला हा नवा नियम १० फेबु्रवारीपासून अंमलात येणार होता. पण, नंतर तो १ मे पासून अंमलात आणण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांना कामगार संघटनेचे सदस्य भेटल्यानंतर, त्यांनी या महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. दत्तात्रेय यांनी पीएफ काढण्याबाबतचे नियम तीन महिन्यांकरिता शिथिल केले. याबाबतची घोषणा त्यांनी पत्रपरिषदेत केली. त्यामुळे आता हे नवीन नियम १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. सोबतच, घरखरेदी किंवा बांधकाम, स्वत:च्या किंवा कुटुंबातील सदस्याचे वैद्यकीय उपचार यासाठी पीएफची काढण्याची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय मुलांच्या वैद्यकीय, दंतवैद्यक आणि अभियांत्रिकी अशा उच्चशिक्षणासाठी तसेच त्यांच्या लग्नकार्यासाठी पीएफची संपूर्ण रक्कम काढण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
केंद्र किंवा राज्य सरकारअंतर्गत असणारे कर्मचारी तसेच अंशदायी भविष्य निधी किंवा वृद्धावस्था निर्वाह निधी (पेन्शन) योगदान करणार्‍यांना देखील पीएफमधील रक्कम काढणे शक्य होणार आहे. हा नवीन बदल ऑगस्टपासून लागू होणार आहे. तसेच या कारणांशिवाय अन्य कुठल्याही कारणांसाठी कर्मचार्‍याला पूर्ण पीएफ मिळणार नाही, त्याला सेवानिवृत्तीपर्यंत अर्थात ५८ व्या वर्षापर्यंत थांबावेच लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27914

Posted by on Apr 20 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (462 of 2453 articles)


कामगारांनी पेटविल्या १५ बसेस पोलिस ठाण्याचीही केली जाळपोळ बंगळुरू, [१९ एप्रिल] - भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून पैसे काढण्याच्या ...

×