Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नवे शैक्षणिक धोरण पुढील वर्षीपासून

नवे शैक्षणिक धोरण पुढील वर्षीपासून

=स्मृती इराणी यांची माहिती=

New Delhi: HRD Minister Smriti Iranii and husband Zubin Irani during Padma Awards 2015 function at Rashtrapati Bhavan in New Delhi on Wednesday. PTI Photo by Subhav Shukla (PTI4_8_2015_000143A)

नवी दिल्ली, [३० नोव्हेंबर] – सरकार नवे सर्वंकष शैक्षणिक धोरण पुढील वर्षीपासून लागू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज सोमवारी लोकसभेत दिली.
नवे शिक्षण धोरण तयार करण्यासाठी सरकारने तळागळापासून उच्च पातळीपर्यंत अनेकांची मते विचारात घेतली आहेत. हे धोरण तयार असून, ते पुढील वर्षीपासून लागू केले जाईल, असे त्यांनी सभागृहात प्रश्‍नोत्तराच्या तासात एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.
शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी आजवर कोणत्याही सरकारने सल्लामसलतीची इतकी व्यापक प्रक्रिया हाती घेतली नव्हती. पण, आम्ही समाजातील प्रत्येक घटकाचे मत विचारात घेतले. चर्चेची सुरुवात तळागळापासून केली. राष्ट्रीय पातळीवरच ती संपली. या प्रक्रियेत दोन लाख ग्राम पंचायता, सहा हजार विभाग आणि अनेक नगर पंचायता सहभागी झाल्या होत्या, असे त्या म्हणाल्या.
अन्य एका पुरवणी प्रश्‍नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळांमधील समन्वय व सहकार्याचे योग्य प्रतिबिंब पुढील वर्षीपासून लागू होणार्‍या नव्या शैक्षणिक धोरणात पाहायला मिळणार आहे. यावेळी केंद्र सरकारच्या ई-पाठशाळा प्रकल्पाचीही त्यांनी माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत सीबीएसईच्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि मोबाईल ऍपच्या माध्यमातून सर्व पुस्तके मोफत उपलब्ध होतील, याची काळजी सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25888

Posted by on Dec 1 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1108 of 2453 articles)


मुंबई, [३० नोव्हेंबर] - ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना २०१५ या वर्षाचा राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार नुकताच जाहीर ...

×