Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नव्या अर्थसंकल्पात सुधारणा जाहीर करणार : स्वराज

नव्या अर्थसंकल्पात सुधारणा जाहीर करणार : स्वराज

Sushma-Swaraj3मस्कत, [१८ फेब्रुवारी] – भारतात नव्याने सत्तेत आलेले सरकार भारताला उत्पादनाचा हब म्हणून विकसित करण्यास कटिबद्ध असून, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी याच महिन्यात सादर होणार्‍या अर्थसंकल्पात आणखी काही नव्या आर्थिक सुधारणांची घोषणा केली जाईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी येथे सांगितले.
भारताला गुंतवणूक आणि उत्पादनाचे केंद्र म्हणून पुढे आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या मेक इन इंडिया अभियानासह अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे सध्या ओमान दौर्‍यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी राजधानी मस्कत येथे जमलेल्या भारतीयांना संबोधित करताना सांगितले. पवित्र गंगा नदी स्वच्छ करण्यासह विकसित करण्याच्या उद्देशाने २०१४ च्या अर्थसंकल्पात एका एनआरआय फंडाची स्थापना करण्यात आली आहे तसेच डिजिटल इंडिया योजनेत सरकारने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. या प्रयत्नांमध्ये परदेशी गुंतवणूकदार आणि अनिवासी भारतीयांनी सहकार्य करावे, असे स्वराज यांनी या तेलसंपन्न देशाच्या पहिल्याच दौर्‍यात बोलताना सांगितले.
सुधारणा म्हणून जे काही निर्णय घेण्यात आले त्यापैकी बर्‍याच निर्णयांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आणखी काही सुधारणा करण्याची सरकारची योजना आहे आणि आगामी अर्थसंकल्पात त्याची घोषणा होऊ शकते, असे स्वराज यांनी फार काही विस्ताराने न सांगता स्पष्ट केले. केंद्र सरकारने सुरू केलेल्या १०० स्मार्ट सिटीज विकसित करण्याच्या योजनेचा त्यांनी विशेष उल्लेख केला आणि यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. याशिवाय बांधकाम, रेल्वे आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो, असे सांगतानाच सुशासन आणि पारदर्शी कारभारासाठी नवे सरकार कटिबद्ध असल्याचे स्वराज यांनी नमूद केले. अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि सध्या देशात असलेल्या वातावरणावरून हे स्पष्टपणे दिसून येते. म्हणूनच अनिवासी भारतीयांनी भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वराज यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20674

Posted by on Feb 19 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (2050 of 2458 articles)


=आपले ‘अच्छे दिन’ आल्याचा दावा= अहमदाबाद, [१८ फेब्रुवारी] - इशरत जहॉं आणि सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आणि गुजरातचे माजी ...

×