Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » नव्या काशीची निर्मिती करणार

नव्या काशीची निर्मिती करणार

=पंतप्रधानांची घोषणा, शिक्षणात गरिबीशी लढण्याची क्षमता=
Narendra-Modi11वाराणसी, [१८ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा कायापालट करण्याचा निर्धार आज शुक्रवारी पुन्हा एकदा व्यक्त केला. या शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासोबतच नवीन काशी (वाराणसी) निर्माण करण्याचा आपला संकल्प असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.
येथे बीएचयू ट्रॉमा सेंटर ऍण्ड पॉवर इंटिग्रेटेड प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यासाठी आयोजित समारंभात ते बोलत होते. बनारस हा माझा मतदारसंघ आहे म्हणून या शहराचा चेहरामोहरा बदलविण्यावर मी भर देत आहे, असा समज कुणीही करू नये. सत्यता अशी आहे की, ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांचे वडील याच शहरातून इंजिनीअर झाले. त्यामुळे आपल्या वडिलांनी जेथून शिक्षण घेतले, तिथूनच स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात यावा, असा विचार कदाचित त्यांच्या मनात आला असावा, असे पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
तत्पूर्वी, सकाळी नरेंद्र मोदी यांचे येथे आगमन झाल्यानंतर रिक्षा संघटनेच्या वतीने आयोजित ‘रिक्षा वाटप’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी कॉंगे्रसवर सडकून हल्ला चढविला. ते म्हणाले की, ज्यांनी आपल्या सत्ताकाळात गरिबांचे बँकेत एकही खाते उघडले नाही, ते जनधन योजनेतील खाते कार्यान्वित नसल्याचे सांगत मला या खात्यांचा हिशेब मागत आहेत. मी हेच सांगायला आलो की, जे काम कॉंग्रेसने ५० वर्षांत केले नाही, ते मी केवळ ५० महिन्यांत करणार आहे.
गरीबांच्या जीवनपद्धतीत बदल करण्यासाठी त्यांना एखादे कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत देशातील प्रत्येक व्यक्तीला आणि त्यांच्या पाल्यांना प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे, हाच आपला एकमेव उद्देश आहे. गरिबीशी लढा देण्याची आणि गरिबीवर मात करण्याची क्षमता केवळ शिक्षणातच आहे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23896

Posted by on Sep 19 2015. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (1447 of 2452 articles)


=भाजपाचा कॉंगे्रसला खडा सवाल= नवी दिल्ली, [१८ सप्टेंबर] - केंद्र सरकारचे भूमी अधिग्रहण विधेयक रोखल्याचा आनंद म्हणून ‘विजय रॅली’चे आयोजन ...

×