Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नव्या ‘जनता’ पक्षाची अखेर स्थापना, मुलायमसिंह अध्यक्ष

नव्या ‘जनता’ पक्षाची अखेर स्थापना, मुलायमसिंह अध्यक्ष

=पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि झेंड्यावर मात्र एकमत नाही=
Mulayam-Singh-Yadav_1नवी दिल्ली, [१५ एप्रिल] – समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, जनता दल सेक्युलर, समाजवादी जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौटाला गट) या सहा पक्षांनी एकत्र येत आज जनता परिवाराच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली. नव्या पक्षाच्या तसेच पक्षाच्या सांसदीय मंडळाच्या अध्यक्षपदी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांची एकमताने निवड करण्यात आली.
पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा झेंडा याबाबत आजच्या बैठकीत सहभागी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही.
परस्परविरोधी मते मांडल्यामुळे याबाबतचा निर्णय नंतर घेण्याचे ठरवण्यात आले. मुलायमसिंह यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुलायमसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. देवेगौडा, राजदचे नेते लालूप्रसाद यादव, जदयु अध्यक्ष शरद यादव आणि ज्येष्ठ नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, सपाचे रामगोपाल यादव आणि शिवकुमार यादव, लोकदलाचे अभय चौटाला आणि समाजवादी जनता पार्टीचे कमल मोरारका उपस्थित होते.
या बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत शरद यादव यांनी नव्या पक्षाची स्थापना झाल्याचे आणि पक्षाच्या तसेच पक्षाच्या सांसदीय मंडळाच्या अध्यक्षपदी मुलायमसिंह यादव यांची एकमताने निवड झाल्याचे सांगितले. नव्या पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि झेंडा याबाबत मात्र आजच्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही, असे स्पष्ट करत यादव म्हणाले की, याबाबत निर्णय घेण्यासाठी एच. डी. देवेगौडा, लालूप्रसाद यादव, शरद यादव, कमल मोरारका, ओमप्रकाश चौटाला आणि रामगोपाल यादव यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पक्षाची ध्येयधोरणे आणि आंदोलनाचा कार्यक्रमही निश्‍चित करेल, याकडे लक्ष वेधत शरद यादव म्हणाले की, देशासमोरील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत.
नव्या पक्षाच्या स्थापनेचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे एच. डी. देवेगौडा यांनी सांगितले. आमच्यात कोणत्याच प्रकारचे मतभेद नाहीत. भाजपाला धडा शिकवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे आणि आमच्यात कोणत्याही प्रकारचा ‘इगो’ नसल्याचे लालूप्रसाद यांनी सांगितले. आम्ही सगळे एकत्र आल्यामुळे बिहारच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागल्याचे ते म्हणाले.
देशाच्या राजकारणाला दिशा देण्याची ताकद नव्या पक्षात असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. सत्तेत आलेल्या नव्या सरकारने एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही, फक्त मोठमोठ्या घोषणा केल्या, असे मुलायमसिंह यादव यांनी सांगितले.
सरकारचे काम विरोधी पक्षांना विश्‍वासात घेऊन कल्याणकारी योजना राबविण्याचे असते, पण सध्याच्या सरकारने असे काहीच केले नाही, याकडे मुलायमसिंह यादव यांनी लक्ष वेधले. त्यामुळे जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आम्ही सर्व जण एकत्र आल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22102

Posted by on Apr 15 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1785 of 2453 articles)


=सरकारने गठित केली उच्चस्तरीय समिती= नवी दिल्ली, [१५ एप्रिल] - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू सूर्यकुमार बोस यांनी सोमवारी रात्री ...

×