Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नव्या विचारांनीच २१ व्या शतकातील समस्यांचा सामना शक्य : अमित शाह

नव्या विचारांनीच २१ व्या शतकातील समस्यांचा सामना शक्य : अमित शाह

=भाजपाचा स्थापना दिन उत्साहात साजरा=
amit-shah-7नवी दिल्ली, [६ एप्रिल] – नव्या कल्पना आणि विचारांनीच २१ व्या शतकात उद्‌भवणार्‍या आव्हानांचा आम्हाला सामना करता येईल, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज सांगितले.
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त मावळंणकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. यावेळी दिल्ली प्रदेश भाजपाचे प्रभारी श्याम जाजू, दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीश उपाध्याय आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. ११ कार्यकर्त्यांपासून सुरू झालेला भाजपाचा प्रवास ११ कोटी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, हा प्रवास साधा नव्हता, तर अनेक हालअपेष्टांनी भरलेला होता, यासाठी लाखो कार्यकर्त्यांना आपल्या सर्वस्वाचे बलिदान करावे लागले, याकडे लक्ष वेधत शाह म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या या मेहनतीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा आज देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाला आहे.
जनता आणि सरकार यांच्यात सेतू बनून भाजपाला काम करावे लागणार आहे, असे स्पष्ट करत शाह म्हणाले की, सत्ता ही आमच्यासाठी साध्य नाही तर गरिबांच्या कल्याणाचे साधन आहे. आम्हाला असा भाजपा घडवायचा आहे, ज्याचा प्रभाव पंचायतपासून संसदभवनापर्यंत राहील. याच्याच आधारे आम्हाला भाजपाची अशी भव्य इमारत उभी करायची आहे, जिच्यासमोर जगातील सर्व इमारती लहान दिसतील. जनसंघाची स्थापना राजकीय स्वार्थासाठी वा सत्ता प्राप्तीसाठी करण्यात आली नव्हती, तर देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी तसेच देशाचा गौरवशाली वारसा जपण्यासाठी करण्यात आली होती, असे शाह यांनी स्पष्ट केले.
आम्ही नेहमीच देशाचा विचार केला, भारताला विश्‍वगुरू बनवण्याचे स्वप्न पाहिले, सबका साथ सबका विकास, हे आमचे ध्येय आहे आणि आमची ही ओळख आम्ही कधीच विसरू शकणार नाही, असेही शाह यांनी सांगितले.
जनसंघापासून सुरू झालेला भाजपाचा प्रवास तीन टप्प्यातील आहे. पहिला टप्पा १९५१ पासून आणिबाणीपर्यंतच्या कालखंडाचा, दुसरा टप्पा १९७७ ते १९८० चा आणि तिसरा टप्पा १९८० मध्ये भाजपाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा आहे, असे स्पष्ट करत शाह म्हणाले की, आमच्या प्रत्येक आंदोलनाचा आधार हा देशाच्या एकता आणि अखंडतेसोबत भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाचा आहे.
यावेळी अमित शाह यांच्या हस्ते भाजपाच्या प्रवासात मोलाचे योगदान देणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27736

Posted by on Apr 7 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (518 of 2453 articles)


नवी दिल्ली, [७ एप्रिल] - भारतीय तंत्रविज्ञान संस्थेच्या (आयआयटी) शैक्षणिक शुल्कात तब्बल एक लाख रूपयांची वाढ करण्यात आल्याचे आज गुरूवारी ...

×