Home » ठळक बातम्या, विदर्भ » नागपूरच्या दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

नागपूरच्या दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

=मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय=
Diksha Bhumi Nagpurमुंबई, [७ मार्च] – जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी महत्त्वपूर्ण असणार्‍या नागपूर येथील दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावास त्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
नागपूर येथील दीक्षाभूमी ऐतिहासिक महत्त्वाची असून, या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर गेली ६० वर्षे हे स्थळ केवळ देशातीलच नव्हे, तर जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी पवित्र मानले जाते. याठिकाणी उभारण्यात आलेला भव्य स्तूप पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरले आहे. देशातील बोधगया या शहराव्यतिरिक्त केवळ दीक्षाभूमीवरच बोधीवृक्ष आहे.
वर्षभरात जवळपास ११ लाख एवढ्या मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक, भाविक आणि अभ्यासक या ठिकाणी भेट देत असतात. त्यात सर्वसामान्य नागरिकांसोबतच विविध मान्यवरांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. याबाबत नागपूरचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी शासनाकडे दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रस्ताव पाठविले होते. यापूर्वी दीक्षाभूमीला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्यात आला होता. मात्र गेल्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षनिमित्ताने दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर याबाबतच्या कार्यवाहीला वेग देण्यात आला. त्यानुसार पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यास मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणार्‍या दीक्षाभूमीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षातच हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27107

Posted by on Mar 8 2016. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (737 of 2455 articles)


=उच्चस्तरीय बैठकीत देशांतर्गत सुरक्षेचा आढावा= नवी दिल्ली, [७ मार्च] - पाकिस्तानमधून लष्कर-ए-तोयबाचे १० अतिरेकी गुजरातमध्ये घुसल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह ...

×