Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नागपूरसह देशात ३ ठिकाणी एम्स स्थापणार

नागपूरसह देशात ३ ठिकाणी एम्स स्थापणार

  • केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
  • १५७७ कोटींची तरतूद
  • नॅशनल वॉर मेमोरियलही उभारणार

All_India_Institute_of_Medical_Sciences_AIIMSनवी दिल्ली, [७ ऑक्टोबर] – पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत महाराष्ट्रातील नागपूरसह देशात तीन ठिकाणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, यामुळे नागपुरातील एम्सचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशात तीन ठिकाणी एम्स आणि राजधानी दिल्लीत इंडिया गेटजवळ राष्ट्रीय युद्ध स्मृती स्मारक (नॅशनल वॉर मेमोरियल) उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रात नागपूर, आंध्रप्रदेशात मंगलगिरी आणि पश्‍चिम बंगालमध्ये कल्याणी अशा तीन ठिकाणी ४९४९ कोटी रुपये खर्च करून प्रत्येकी ९६० खाटांचे अत्याधुनिक असे एम्स उभारले जाणार आहे. राज्यातील जनतेला उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी एम्स उभारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे सांगण्यात आले.
एम्समध्ये शैक्षणिक संकुल, प्रशासकीय संकुल, आयुष संकुल, ऑडिटोरियम, नर्सिग कॉलेज, होस्टेल, रात्रनिवारा आणि निवासव्यवस्था राहणार आहे. नागपूरच्या एम्ससाठी १५७७ कोटींची, मंगळगिरीच्या एम्ससाठी १६१८, तर कल्याणीच्या एम्ससाठी १७५४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नॅशनल वॉर मेमोरियल उभारणार
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या विविध युद्धांमध्ये देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्‍या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवी दिल्लीच्या ऐतिहासिक इंडिया गेटजवळील प्रिन्सेस पार्क येथे नॅशनल वॉर मेमोरियल आणि नॅशनल वॉर म्युझियम उभारण्याचा निर्णयही आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी सुमारे २२५०० जवान शहीद झाले. या शहीद जवानांचे स्मारक उभारावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लष्कराकडून केली जात होती. पण, देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाल्यानंतरही या मागणीकडे आतापर्यंत कोणत्याच सरकारने लक्ष दिले नव्हते. मोदी सरकारने मात्र दीर्घकाळापासून प्रलंबित ही मागणी मान्य केली. एवढेच नव्हे तर यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. ५ वर्षांत हे स्मारक उभारले जाणार आहे. हा प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण होईल की नाही हे पाहण्यासाठी संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समितीही गठित करण्यात आली आहे. या समितीत मॅनेजमेंट तज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.
लोकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागविण्यासाठी, तसेच शहीद जवानांबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण करण्याचे काम या स्मारकातून केले जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25020

Posted by on Oct 8 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1365 of 2453 articles)


=नासाने काढले भारत-पाक सीमेचे छायाचित्र= वॉशिंग्टन, [६ ऑक्टोबर] - भारत आणि पाकिस्तानला विभागणारी सीमा म्हणजेच नियंत्रण रेषा. गेल्या अनेक वर्षांपासून ...

×