Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नागरिक चोवीस तास कसे घालवितात?

नागरिक चोवीस तास कसे घालवितात?

=केंद्र सरकार करणार सर्व्हे=
narendra-modi4नवी दिल्ली, [२१ जानेवारी] – देशवासीयांच्या गुणात्मक विकासाकरिता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अभिनव प्रयोग करण्याचे ठरविले आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून लोकांना केवळ वस्तू व सेवा उपलब्ध न करता, देशभरातील नागरिक दिवसातील २४ तास कसे घालवतात, याचा अभ्यास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सरकार यासाठी देशव्यापी सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणात केवळ पुरुषांनाच नव्हे, तर महिलांना अर्थात गृहिणींना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. कारण, आजवरच्या बहुतांश अभ्यासात घराच्या चार भिंतीत राहणार्‍या गृहिणी आपला दिवस कसा घालवितात, दिवसभर त्या काय काम करीत असतात, याचा अभ्यास कुणीच केला नाही. त्यामुळे सरकारने त्यांच्या दैनंदिनीचाही अभ्यास करण्याचे ठरविले आहे.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे हा अभ्यास करण्यात येणार असून, त्यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनचीही मदत घेतली जाणार आहे. घरातील स्वयंपाक, स्वच्छता, मुलांचा गृहपाठ यासारख्या कामांमध्ये महिलांचा वेळ कसा जातो, हा या अभ्यासाचा केंद्रबिंदू राहणार आहे. सर्वेक्षणाशी संबंधित या विभागाच्या समितीचे अध्यक्ष आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ एस. आर. हाशिम यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, घरात राहाणार्‍या महिला अनेक प्रकारची कामे करीत असतात. स्वयंपाकघर सांभाळण्यासोबतच घराची स्वच्छता करणे, मुलांना शाळेत नेणे व परत आणणे, घरातच बसून मिळकतीची इतर कामे करणे आदी कामात त्या दिवसभर व्यस्त असतात. असे असतानाही सकल राष्ट्रीय उत्पन्नात त्यांच्या योगदानाचा विचार मात्र होत नाही.
हाशिम यांनी या सर्वेक्षणाकरिता सुमारे एक हजार कामांची निश्‍चिती केली आहे. यात जुगार खेळणे, चित्रपट पाहणे, मुलाखत घेणे, योग करणे आणि मद्य प्राशन करणे आदींचाही समावेश आहे. सोबतच, आपल्या मित्र-मैत्रिणींचा रिकामा वेळ कोणता आहे, हे जाणून घेण्यासाठी फेसबुक आणि व्हॉट्‌स ऍपवर त्यांना सर्च करण्याचाही समावेश आहे. इतकेच नव्हे, तर पार्ट्यांकरिता क्लबमध्ये जाणे, घराच्या बगिच्यात फिरणे आणि परीक्षेची तयारी करणे याचाही यात अभ्यास करण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19881

Posted by on Jan 21 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2195 of 2453 articles)


=२८ जानेवारीपूर्वी दहशतवादी हल्ल्याची शक्यता= मुंबई, [२२ जानेवारी] - मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २८ ...

×