Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » नाराजी नाही : उद्धव ठाकरे

नाराजी नाही : उद्धव ठाकरे

Uddhav-Thackerayमुंबई, [८ जुलै] – राज्य मंत्रिमंडळाच्या आज शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्या मनात कुठलीही नाराजी नाही. आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. आम्ही जर नाराज असतो, तर आमच्या खास शैलीत उत्तर दिले असते, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विशद केली.
आम्हाला या विस्तारात राज्यमंत्रिपद मिळाले आणि त्यावर आम्ही खुश आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नव्या मंत्र्यांच्या शपथविधीत उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी चालविल्या होत्या. पण, उद्धव ठाकरे यांनी या बातम्यांचे खंडन केले.
आम्ही मुळीच नाराज नाही. केंद्राप्रमाणेच राज्यातही भाजपाला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कुणाला काय द्यायचे, हा निर्णयही भाजपाचाच राहणार आहे, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29076

Posted by on Jul 9 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (149 of 2452 articles)


नवी दिल्ली, [८ जुलै] - मादक द्रव्यांचा दुरुपयोग आणि अवैध व्यापार ही अतिशय गंभीर बाब असून मादक द्रव्यांच्या व्यापारामुळेच आज ...

×