Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » नासाने शोधलेल्या नव्या तार्‍यांचे नामकरण

नासाने शोधलेल्या नव्या तार्‍यांचे नामकरण

=सातमध्ये दोन भारतीय नावांचा समावेश=
NASA_logoनागपूर, [२५ ऑक्टोबर] – नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने शोध लावलेल्या दोन तार्‍यांचे नामकरण करण्यासाठी जगभरातून मागविण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी स्वीकृत करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये दोन भारतीय नावांचा समावेश आहे.
नासाने ‘तौ बुटीस’ आणि त्याचा उपग्रह ‘तौ बुटीस-बी’ या दोन तार्‍यांचा शोध लावला आहे. या तार्‍यांना महापुरुष किंवा जागतिक महत्त्वाच्या ठिकाणांचे नाव देण्याचा निर्णय नासाने घेतला आणि जगभरातून नावांचे प्रस्ताव मागितले. अनेक देशांनी नासाकडे नावांचे प्रस्ताव पाठविले आहेत. यात भारतानेही सहभाग घेतला आणि प्रस्ताव पाठविले. नासाने असंख्य प्रस्तावांपैकी केवळ सात नावांची निवड केली असून, त्यात भारताने सुचविलेल्या ‘श्रीराम मत्त’ आणि ‘भगवती देवी शर्मा’ या दोन नावांचा समावेश आहे. ‘तौ बुटीस’साठी श्रीराम मत्त आणि ‘तौ बुटीस-बी’साठी भगवती देवी शर्मा, असे नाव भारतातर्फे सुचविण्यात आले आहे.
या दोन्ही तार्‍यांचे नामकरण करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान घेतले जात आहे. यात ज्या नावांना सर्वाधिक मते मिळतील, त्याच नावांची निवड करण्यात येणार आहे. या तार्‍यांना भारतीय महापुरुषांचेच नाव मिळावे आणि ते नाव ब्रह्मांडात कोरले जावे आणि भारताच्या गौरवशाली इतिहासात नवा अध्याय जोडला जावा, अशी इच्छा प्रत्येकच भारतीयाच्या मनात असल्याने, आपल्यापैकी प्रत्येकाने या प्रक्रियेत सहभागी होऊन भारतासाठी मतदान करण्याच्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल विश्‍व गायत्री परिवारातर्फे करण्यात आले आहे.
कोणताही स्मार्ट फोन, लॅपटॉप किंवा संगणकाच्या माध्यमातून मतदानात सहभागी होता येणार आहे. मतदानासाठी http://nameexoworlds.iau.org/systems/ १०७ या नावाची वेबसाईट असून, ती उघडल्यानंतर प्रस्तावित नावे समोर येतील. भारतीयांनी यातील श्रीराम मत्त आणि भगवती देवी शर्मा या नावांची निवड करावी आणि त्यांच्यासमोर दिलेले बटन दाबावे. त्यानंतर एक रकाना दिसेल, त्यावर ‘आय एम नॉट रोबो’ असे लिहिले असेल. त्या रकान्यात क्लिक करा. यात तुम्हाला काही चित्र दिसले, तर त्यात विचारण्यात आलेल्या पदार्थांच्या चित्रांवर क्लिक करा. त्यानंतर तीनवेळा ‘थँक यू’ असे नमूद असलेले पान समोर येईल. लक्षात ठेवा, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्ही दिलेल्या मताची गणना केली जाणार नाही.
एकाच संगणकावरून अनेक लोकांना मतदान करण्यासाठी आवश्यक प्रारूप त्यात जोडण्यात आले आहे. यामुळे एकाच वेळी शंभरावर मते टाकणे शक्य झाले आहे. त्यासाठी http://nameexoworlds.iau.org/exoworldsvote हे सांकेतिक स्थळ आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर व्यक्तींच्या समूहाला ‘धिस फॉर्म’ या शब्दावर क्लिक करायची आहे. त्यानंतर एकाच वेळी अनेकांना मतदान करता येईल, असा फॉर्म समोर येईल. तो भरून पुन्हा संगणकाच्या माध्यमातून परत पाठवायचा आहे. एक-दोन दिवसांत आयएयूकडून पासकोड येईल. त्यानंतर एकाच संगणकातून आपण जितक्या लोकांची नोंद केली आहे, त्या सर्वांना एकत्रित मतदान करणे शक्य होणार आहे. जितके जास्त मतदान होईल, तितकाच भारताचा फायदा होणार आहे. या फॉर्ममध्ये आपले नाव, ई-मेल, संस्थेचे नाव आणि किती जण मतदान करणार आहेत, याबाबतचा उल्लेख असणे आवश्यक आहे. तुम्ही यात कितीही सदस्यांची संख्या नमूद करू शकता. सर्वच कार्यालये, विद्यालये आणि संस्था याचा लाभ घेऊ शकतात, असेही गायत्री परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25321

Posted by on Oct 26 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1282 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२५ ऑक्टोबर] - भांडवली क्षेत्राला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी केंद्राने पावले उचलली असून, येणार्‍या दशकात ३५ लाख नोकर्‍यांचे ...

×