ना एफआयआर, ना अटक

=मौलाना मसूदप्रकरणी पाकची बनवाबनवी=
Masood Azhar- Jaish-e-Mohammadनवी दिल्ली, [१९ जानेवारी] – पठाणकोट येथील वायुसेनेच्या हवाई तळावर गेल्या २ जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरच्या अटकेबाबत पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. मसूद आणि जैशच्या अनेक अतिरेक्यांना अटक करण्यात आली असल्याचा दावा पाकने केला असतानाच, प्रत्यक्षात त्याला अटक तर दूरच, साधा एफआयआरही दाखल करण्यात आला नसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूदच असल्याचे ठोस पुरावे भारताने पाक सरकारला दिले आहेत. काही मोबाईल क्रमांकही सोपविले. त्यानंतर विदेश सचिव स्तरावरील चर्चा रद्द होण्याच्या भीतीने पाक सरकारने मसूद आणि जैशच्या अन्य अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्याचा देखावा रंगविला. भारतानेही या कारवाईवर विश्‍वास ठेवून, सचिव पातळीवरील चर्चा रद्द करण्याऐवजी लांबणीवर टाकली. पाकवर अविश्‍वास करण्याचे काहीच कारण नाही, असे स्वत: केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही स्पष्ट केले. पण, पाकने मात्र सवयीप्रमाणे पुन्हा एकदा आपला रंग दाखविला.
मसूदविरुद्ध पाक सरकारने काय कारवाई केली, हे जाणून घेण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकमधील आपल्या सूत्रांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. मसूदविरोधात पठाणकोट हल्ल्याप्रकरणी कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही आणि त्याला अटक तर सोडाच, नजरकैदही करण्यात आले नाही. नेहमीप्रमाणेच तो मोकळा फिरत आहे, असे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.
पाक पोलिसांनी ज्या लोकांना अटक केली आहे, ते जैशचे अतिशय कनिष्ठ स्तरावरील सदस्य असून, त्यांच्याजवळून जी कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत, त्यांचाही पठाणकोट हल्ल्याच्या योजनेशी काहीच संबंध नाही. मसूदविरोधात कोणतीही कारवाई झाली नसतानाही, पाकच्या सुरक्षा यंत्रणांनी मात्र पद्धतशीरपणे तसा प्रचार करून, केवळ भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांची दिशाभूल केली आहे, असे वास्तवही पुढे आले आहे. इतकेच नव्हे, तर अतिरेक्यांजवळ सापडलेले दोन मोबाईल क्रमांक भारताने पाकला दिले. ते कुणाचे आहेत, याचा खुलासाही अद्याप झाला नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26608

Posted by on Jan 20 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (884 of 2453 articles)


=मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्राद्वारे केला खुलासा= हैदराबाद, [१९ जानेवारी] - संशोधन विषयाचा विद्यार्थी असलेला रोहित वेमुला याने हैदराबाद विद्यापीठातील आवारात असलेल्या ...

×