Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » निंबाळकर, धनंजय मुंडेंचा पराभव निश्‍चित

निंबाळकर, धनंजय मुंडेंचा पराभव निश्‍चित

  • सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेते एकाचवर्षी निवृत्त होणार
  • विधान परिषद इतिहासातील पहिलीच घटना

maharashtra-vidhansabha mumbaiमुंबई, [१६ एप्रिल] – महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासात प्रथमच या वरिष्ठ सभागृहाचे सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेते यांची सदस्यत्वाची कारकीर्द याच वर्षी जून आणि जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे. यातही विशेष म्हणजे, तब्बल १५ वर्षे एकमेकांसोबत सत्तेत राहिलेल्या कॉंगे्रसने आगामी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करण्याची व्यापक रणनीती तयार केली आहे.
सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची कारकीर्द येत्या ७ जुलै रोजी संपुष्टात येणार असून, उपसभापती वसंत डावखरे यांची कारकीर्द ८ जून रोजी संपणार आहे.
कॉंगे्रस आणि राष्ट्रवादी कॉंगे्रस आघाडीचे परिषदेत वर्चस्व असून, भाजपा-शिवसेना युतीला पराभूत करण्याइतके पाठबळ दोन्ही कॉंगे्रसजवळ आहे. पण, शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादीने अविश्‍वास प्रस्ताव आणला होता. हा राग अजूनही कॉंगे्रस नेत्यांच्या मनात आहे.
या वर्षभरात परिषदेतील एकूण १० सदस्य निवृत्त होणार आहेत. यातील कॉंगे्रसचे दोन, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी दोन आणि कॉंगे्रससमर्थित एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे. निंबाळकर आणि धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा या वरिष्ठ सभागृहात आणण्यासाठी आम्हाला कॉंगे्रसच्या समर्थनाची गरज आहे. या मुद्यावर आमची त्यांच्यासोबत चर्चाही सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
तथापि, परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादीने अविश्‍वास आणल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. याचा बदला आम्ही घेणारच आहोत. निंबाळकर आणि मुंडेंना आम्ही पाठिंबा द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीने केले असले, तरी आमचा त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. पण, आम्हाला सध्याच आमची रणनीती जाहीर करायची नाही. कारण, याचा परिणाम अधिवेशनाच्या कामकाजावर होईल, असे कॉंगे्रसच्या एका वरिष्ठ नेत्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27829

Posted by on Apr 17 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (489 of 2451 articles)


=सुषमा स्वराज इराण, रशिया दौर्‍यावर रवाना= नवी दिल्ली, [१६ एप्रिल] - आपल्या रशिया दौर्‍यात आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन भारतीय ...

×