Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » निगोशिएबल इन्स्ट्रूमेन्टस् कायद्यातही दुरुस्ती होणार

निगोशिएबल इन्स्ट्रूमेन्टस् कायद्यातही दुरुस्ती होणार

NITIN_GADKARI1नवी दिल्ली, [१० जून] – निगोशिएबल इन्स्ट्रूमेन्टस् कायद्यातही दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बुधवारी घेतला. यामुळे धनादेश ज्या ठिकाणी जारी करण्यात आला होता, तिथेच धनादेश अनादरप्रकरणी खटला दाखल करण्याची परवानगी मिळणार आहे. या निर्णयामुळे देशातील १६ लाख लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, या कायद्याविषयी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. एखाद्याकडून आपल्याला धनादेश मिळाला आणि त्याचा अनादर झाल्यास, जिथे धनादेश देण्यात आला होता तिथेच किंवा त्याच राज्यात खटला भरता येऊ शकतो, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानेही दिला आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे धनादेश अनादर प्रकरणी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे १८ लाख लोकांना फायदा होणार आहे. देशातील विविध न्यायालयांमध्ये असे १८ लाख खटले प्रलंबित आहेत. सरकारने या संदर्भात संसदेत विधेयक आणले होते. लोकसभेत ते पारित झाले. पण, विरोधकांनी राज्यसभेत ते पारित होऊ दिले नाही. सर्वसामान्यांना दिलासा हाच सरकारचा उद्देश असल्याने सरकार यावर अध्यादेश जारी करणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22813

Posted by on Jun 11 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1636 of 2453 articles)


पाटणा , [१० जून] - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची आज बुधवारी फेरनिवड करण्यात आली. पाटण्यामध्ये पक्षाच्या ...

×