Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » नितीशकुमारांचे पंतप्रधानांना निमंत्रण

नितीशकुमारांचे पंतप्रधानांना निमंत्रण

narendra-modi-nitishपाटणा, [१७ नोव्हेंबर] – भाजपाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शत्रुघ्न सिन्हा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यासारख्या नेत्यांना आपल्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठविल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना उशिरा का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवण झाली. कुमारांनी आज मंगळवारी पंतप्रधानांना २० नोव्हेंबर रोजी होणार्‍या शपथविधी सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण पाठविले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेणार्‍या नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील महाआघाडीला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यानंतर त्यांना जणू मोदी यांचा विसरच पडला होता. म्हणूनच की काय, त्यांनी आतापर्यंत सर्व नेत्यांना निमंत्रण पाठविले. पण, त्यात पंतप्रधान मोदी यांचा समावेश नव्हता. आपण कुठेतरी चूक करीत असल्याची जाणीव त्यांना बहुधा झाली असावी आणि ती दुरुस्त करीत, त्यांनी मंगळवारी पंतप्रधानांना निमंत्रण पाठविले. पंतप्रधानांसोबतच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही निमंत्रण दिले आहे, अशी माहिती सूत्राने दिली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली होती. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडल्या होत्या. निवडणूक संपली असल्याने प्रचारात जे काही आरोप झाले, ते केवळ राजकीय होते. तो विषय आता संपला असून, नितीशकुमार सरकारला केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली होती, हे विशेष!

Short URL: https://vrittabharati.in/?p=25509

Posted by on Nov 17 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1223 of 2452 articles)


आरपारची लढाई सुरू २० बॉम्ब डागले, अनेक अड्डे नष्ट पॅरिस, [१६ नोव्हेंबर] - १२९ नागरिकांचे बळी घेणार्‍या पॅरिसवरील हल्ल्यानंतर ...

×