Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नितीशकुमारांना आता पंतप्रधानपदाचे डोहाळे

नितीशकुमारांना आता पंतप्रधानपदाचे डोहाळे

nitish_kumarनवी दिल्ली, [१६ नोव्हेंबर] – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत रालोआला पराभूत केल्यानंतर जदयु-राजद-कॉंगे्रसचा समावेश असलेल्या महाआघाडीने आता केंद्रातील सत्तेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. बिहार निवडणुकीने भाजपाविरोधी आघाडीच्या नव्या पर्वाला प्रारंभ केला असल्याने देशातही अशीच आघाडी तयार करण्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून नितीशकुमार यांना समोर करण्याचे आवाहन जदयुने केले आहे.
नरेंद्र मोदी यांना केवळ नितीशकुमार हेच पर्याय ठरू शकतात. कारण, बिहारमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांनाच थेट पराभूत केले आहे. त्यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याचीही क्षमता आहे, असा युक्तिवादही जदयुचे बिहार प्रदेशाध्यक्ष वशिष्ट नारायण सिंह यांनी केला.
मोदी यांना पर्याय म्हणून माझा आग्रह नितीशकुमारांसाठी असला, तरी अशा आघाडीत एकत्र येणारे राजकीय पक्ष आपले विचार स्वतंत्रपणे मांडू शकतात. राष्ट्रीय स्तरावर आघाडीचे नेतृत्व कोण करणार, यावर चर्चा करूनच निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
भाजपाला राष्ट्रीय राजकारणातून हद्दपार करण्यासाठी बिहारमधील अनुभवाच्या आधारे सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे. इतकेच नव्हे, तर संसदेतही सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर एकत्र यावे. बिहारमध्ये भाजपाच्या पराभवामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्ष खुश आहेत, असे तर्कटही त्यांनी मांडले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25487

Posted by on Nov 17 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1231 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१६ नोव्हेंबर] - नेस्ले इंडियाची मॅगी भारतीय बाजारात परतत असतानाच रामदेव बाबा यांच्या पतंजलीचे नूडल्सही बाजारात दाखल झाले ...

×