Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नितीशकुमार पंतप्रधान मोदींना भेटले

नितीशकुमार पंतप्रधान मोदींना भेटले

=बिहारसाठी मागितली आर्थिक मदत=
nitish-meets-modiनवी दिल्ली, [२६ मार्च] – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज गुरुवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि मागास बिहारच्या विकासासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी केली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध करून नितीशकुमार यांनी भाजपाशी १७ वर्षांपासून असलेली युती तोडली होती. मात्र, यानंतरही बिहारमध्ये सत्तारूढ जदयु आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजदला जबर पराभव पत्करावा लागला आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने २८२ जागांच्या स्पष्ट बहुमतासह केंद्रात सरकार स्थापन केले. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीतीशकुमार यांच्या झालेल्या या भेटीकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथे झालेल्या गंगा बेसिन ऍथॉरिटीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नितीशकुमार दिल्लीला आले होते.
याबाबत प्राप्त झालेल्या वृत्तानुसार नितीशकुमार यांनी गुरुवारी दुपारनंतर पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा विराजमान झाल्यानंतर नितीशकुमार यांनी प्रथमच मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नितीशकुमार यांनी मोदींसोबत आर्थिक विषयांवर सविस्तर चर्चा केल्याचे सूत्राच्या हवाल्याने देण्यात आलेल्या वृत्तात म्हटले आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यास केंद्राकडून बिहारला मिळणार्‍या मदतीमध्ये कपात होण्याची शक्यता लक्षात घेता नितीशकुमार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या शिफारशींची अंमलबावणी करण्यात आल्यास बिहारला ५० हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे आणि त्याची भरपाई केंद्राने करावी, अशी मागणी नितीशकुमार यांनी यावेळी पंतप्रधानांकडे केली.
याशिवाय २००० साली बिहारचे विभाजन झाल्यानंतर मागास भागासाठी देण्यात येणार्‍या (बीआरजीएफ) निधीत कपात झाल्यामुळे बिहारला विशेष आर्थिक मदत देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली, असे नितीशकुमार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्याला मिळालेल्या १२ हजार कोटींच्या निधीतून राबविण्यात येणार्‍या योजनांना केंद्राने आधीच हिरवा कंदील दिला आहे, असेही नितीशकुमार म्हणाले.
पंतप्रधान मोदी आणि नितीशकुमार यांची ही सदिच्छा भेट होती, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. नितीशकुमार यांनी गेल्या २३ मार्च रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपाने बहिष्कार घातला होता. वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे होणार्‍या ५० हजार कोटींच्या कथित नुकसानाबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21746

Posted by on Mar 27 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1844 of 2453 articles)


=हाजी कलिमुल्ला यांनी तयार केली नवी जात= लखनौ, [२६ मार्च] - गेल्या वर्षभरात देशविदेशात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

×