नितीशकुमार म्हणजे स्वप्न पाहणारा मुंगेरीलाल
Tuesday, October 6th, 2015=अमित शाह यांचा चिमटा=
सुपौल, [५ ऑक्टोबर] – मुंगेरीलालप्रमाणे नितीशकुमार पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहात होते व त्या महत्त्वाकांक्षेमुळेच त्यांनी रालोआशी असलेले नाते तोडले, अशी परखड टीका भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी नितीशकुमार यांच्यावर येथे केली.
स्थानिक स्टेडियम मैदानावर भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना शाह बोलत होते.
एका राष्ट्रीय विचारधारेने मार्गक्रमाण करून देशात परिवर्तन आणणारी भाजपा असल्याचे सांगून, शाह पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आमचा पक्ष निवडणुका जिंकतो.
ही निवडणूक फक्त बिहारची नसून संपूर्ण देशाची आहे. समाज विघातक शक्ती या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपावर आरोप करीत आहेत. पण, बिहार ही लोकशाहीची जननी आहे. येथील आगामी निवडणूक विकास विरुद्ध जंगलराज या मुद्यावर लढवली जात असल्याने येथील जनता आमच्याबरोबर असून, पूर्ण बहुमताने रालोआ येथे सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वास यावेळी आपल्या भाषणातून शाह यांनी व्यक्त केला.
नितीशकुमार पंतप्रधान होऊ इच्छित होते. आम्ही त्यांना त्या पदावर बसवलेही असते, पण बिहार व्यतिरिक्त देशात कुठेच त्यांना समर्थन नसल्याने त्यांची महत्त्वाकांक्षा आम्ही पूर्ण केली नाही. ती पूर्ण होत नसल्याचे जाणवताच त्यांनी जात व धर्म पुढे करीत रालोआपासून फारकत घेतली, अशी टीकाही शाह यांनी केली.
लालू-नितीश जोडीने २५ वर्षे बिहारमध्ये राज्य केले असून, आता ते विकासाया गोष्टी करीत आहेत, याकडे लक्ष वेधत शाह म्हणाले की, इतकी वर्षे वाया घालवल्यावर आता त्यांना विकास आठवला आहे. बिहारमध्ये लिहिणे-वाचणे मागे पडले, राज्यात विजेअभावी अंधार पसरला, जंगलराजही हटवू शकले नाही, हाच का बिहारमधील आतापर्यंतचा विकास, असा प्रश्न उपस्थित करून हे जंगलराज संपवण्यासाठीच भाजपा कार्यकर्त्यांनी आतापर्यंत मेहनत घेतली असून, लालूंच्या खांद्यावर बसलेल्या नितीशकुमारांना हे जंगलराज दिसत नसल्याने त्यांना सत्तेवरून दूर करण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे, याची जाणीव शाह यांनी करून दिली.
Short URL: https://vrittabharati.in/?p=24156

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!