Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » नियंत्रण रेषेवर ‘रिमोट गन’ तैनात करणार

नियंत्रण रेषेवर ‘रिमोट गन’ तैनात करणार

=घुसखोरी रोखण्यास मदत मिळणार=
remote-gunश्रीनगर, [५ ऑक्टोबर] – पाकव्याप्त काश्मिरातून दररोज होणारी अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर ‘रिमोट’च्या मदतीने हाताळली जाणारी मशिनगन तैनात करण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे. नजीकच्या भविष्यातच विविध ठिकाणी या मशिनगन्स आपली आघाडी सांभाळणार आहेत.
काश्मीर खोर्‍याला जम्मूपासून वेगळे करणार्‍या पीर पंजालमधील पर्वतीय भागांमधून घुसखोरीचा धोका वाढला असल्याने, या भागात या रिमोट गन्स जास्त उपयुक्त ठरणार आहेत, अशी माहिती लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
अशा प्रकारच्या रिमोट कंट्रोल मशिनगनची पहिली प्रतिकूती तयार झाली असून, अखनूर येथील पर्वतीय भागात तिची यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली आहे. या रिमोट गनने अपेक्षेनुसार परिणाम दिले असल्याचा दावाही अधिकार्‍याने केला. अतिरेक्यांची घुसखोरी रोखताना अनेकदा जवान शहीद होतात. लष्करात होणारी प्राणहानी रोखण्यासाठीच या रिमोट गन्सचा विकास करण्यात आला आहे, असे अधिकारी म्हणाला.
संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेल्या या रिमोट गनमध्ये सेन्सॉर यंत्रणा बसविण्यात आली असल्याने सुमारे ८० मीटरच्या परिसरातील हालचालींचा ती अचूक वेध घेऊन लक्ष्य भेदू शकते. या गनची मारक क्षमता आणखी वाढविण्यावर अभ्यास करण्यात येत आहे, असेही अधिकार्‍याने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24159

Posted by on Oct 6 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1377 of 2453 articles)


=जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठाने दिली मानद उपाधी= मुंबई, [५ ऑक्टोबर] - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार असल्याची ...

×