Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » निवडणूक निकालांवर भाष्य करण्यास अमेरिकेचा नकार

निवडणूक निकालांवर भाष्य करण्यास अमेरिकेचा नकार

usa-flag-mapवॉशिंग्टन, [११ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर कोणतेही भाष्य करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. आपल्या अलीकडील भारत भेटीमुळे दोन देशातील संबंधात बरीच सुधारणा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर दिल्ली निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे ओबामा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीतील विभानसभा निवडणुकीत एकूण ७० पैकी ६७ जागांवर दणदणीत विजय संपादन केला. यावर प्रतिक्रिया विचारल्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्त्या जेन साकी म्हणाल्या की, ही निवडणूक भारताची अंतर्गत बाब आहे. भारत आणि अमेरिकेचे संबंध बराक ओबामा यांच्या भेटीनंतर अतिशय मजबूत होत आहेत, यातच सर्व काही आले आहे, असे मत व्यक्त करीत दिल्ली निकालांवर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.
दरम्यान, राजकीय विश्‍लेषकांच्या मते, आपच्या विजयाने भ्रष्टाचार हा मुद्दा इतक्यात संपणारा नाही, हे दाखवून दिले असून, मतदारांसाठी विकासाशी संबंधित मुद्दे विशेषत: वीज, इतर मूलभूत गरजा आणि मोदी सरकारची यासंबंधीची प्राथमिकता या बाबी अजूनही महत्त्वाच्या आहेत. मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक पुनित मनचंदा म्हणाले की, आपच्या विजयाने भाजपाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. तर याच विद्यापिठातील प्राध्यापिका लीला फर्नांडिस यांनी आपला मिळालेल्या प्रचंड यशाने या निकालांना विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे मत व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20507

Posted by on Feb 12 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (2079 of 2458 articles)


=दिल्लीला मागितला राज्याचा दर्जा, केजरीवाल आज पंतप्रधानांना भेटणार= नवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] - दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणारे आम ...

×