Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » निष्काळजीपणामुळे २९ हजार डोळे निकामी

निष्काळजीपणामुळे २९ हजार डोळे निकामी

eye donationचेन्नई, [१७ मार्च] – ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ या उक्तीनुसार मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी दुसर्‍यांना हे जग बघता यावे, या इच्छेने नेत्रदान करणार्‍या अनेकांची ही अखेरची इच्छा अपूर्ण राहिली आहे. नेत्रदान केल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे २९ हजार डोळे निकामी झाले आहेत. ही आकडेवारी २०१३-२०१४ या वर्षातील असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
विविध योजना, जाहिराती आणि जनजागृती कार्यक्रमातून नेत्रदान करण्याविषयी नागरिकांना प्रोत्साहित केले जाते. समाजाप्रती आपली जाणीव लक्षात घेऊन या वर्षात हजारो लोकांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, या वर्षात ५१,३५४ नेत्र प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाले होते. मात्र, नेत्ररोपण शस्त्रक्रिया करण्यास उशीर झाल्यामुळे आणि दान केलेले डोळे वैद्यकीयदृष्ट्या वापरण्यास अयोग्य ठरल्यामुळे त्यापैकी २२,३८४ डोळ्यांचाच नेत्ररोपण शस्त्रक्रियेसाठी उपयोग झाला. बाकी सर्व डोळे वाया गेले. हे प्रमाण ५६ टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
मृत्यूनंतर सहा तासात नेत्र काढून ते विशिष्ट रसायनांमध्ये ठेवून शास्त्रीय पद्धतीने सुरक्षित ठेवले जातात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जास्तीत जास्त १४ दिवसात नेत्ररोपण करावे लागते. या कालावधीत दान केलेल्या डोळ्यांची शास्त्रीय पद्धतीने निगा राखावी लागते. या प्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्यास दान केलेले डोळे प्रत्यारोपणासाठी वापरता येत नाहीत.
देशाच्या अनेक भागांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे दान केलेल्या डोळ्यांची निगा राखणे कठीण आहे. या परिस्थितीमुळेच हजारो डोळे वाया गेल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. मृत्यूपूर्वी नेत्रदानाची इच्छा व्यक्त करणार्‍या व्यक्तींच्या नातलगांनी वेळेत डॉक्टरांना माहिती न दिल्याने अनेक डोळे वैद्यकीयदृष्ट्या वापरण्यास अयोग्य झाले. वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विकास आणि नेत्रदानाविषयी जनजागृती हाच या समस्येवर उपाय असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21538

Posted by on Mar 18 2015. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य (1887 of 2452 articles)


=महाराष्ट्रावर ३ लाख ४७७ कोटींचे कर्ज= मुंबई, [१७ मार्च] - २०१५-१६ या वर्षाचा राज्याचा भाजपा-सेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री ...

×