Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘नीट’ची फेरविचारावर मंगळवारी सुनावणी

‘नीट’ची फेरविचारावर मंगळवारी सुनावणी

supreme_courtनवी दिल्ली, [२ मे] – वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेला ‘नीट’ चा पहिला टप्पा रविवारी यशस्वीपणे पार पडल्यानंतर या परीक्षेबाबत आठ राज्यांनी दाखल याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी उद्या मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे. उद्या दुपारी दोन वाजता ही सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ परीक्षा यावर्षी पासून सक्तीची करण्याचा आदेश दिला, त्याला केंद्र सरकार आणि वेद्यकीय शिक्षण परिषदेने न्यायालयात पाठिंबा दिला होता. त्यामुळे न्यायालयाने ‘नीट’ ची सक्ती करण्याचे आदेश दिले. मात्र नीट परीक्षेला अनेक राज्यांनी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी विरोध केला आहे. केंद्र सरकारने कोणाशीच सल्लामसलत न करता होकार दिल्याने अनेक राज्य आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी सर्वोच्च न्यायालयात नीट परीक्षेची सक्ती मागे घ्यावी यासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेरविचाराच्या याचिका फेटाळून लावला होता व आपला निर्णय कायम ठेवला होता. वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी एमएचसीईंटी प्रवेश परीक्षा येत्या ५ मे रोजी घेतली जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28122

Posted by on May 2 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (397 of 2453 articles)


=दारू, मादक द्रव्यांचा महापूर= नवी दिल्ली, [१ मे] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सेक्स रॅकेटचा अड्डा झाले असून विद्यापीठात दारू आणि ...

×