Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘नीट’वर राष्ट्रपतींची मोहोर

‘नीट’वर राष्ट्रपतींची मोहोर

neet- medical enterence examनवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेने पारित केलेल्या दोन कायद्यांवर आपली मोहोर उमटवली असून, यामुळे यानंतर देशात वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकच राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) घेण्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंडियन मेडिकल कौन्सिल (दुरुस्ती) विधेयक, २०१६ व दंतचिकित्सक (दुरुस्ती) कायदा, २०१६ या दोन कायद्यांना मान्यता दिली, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. हे दोन्ही कायदे राज्यसभेत १ ऑगस्ट रोजी पारित करण्यात आले आणि त्याचदिवशी नीटचा मार्ग मोकळा झाला होता. भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासह पादर्शकता आणणे, परीक्षांमधील बहुलता टाळणे आणि कौन्सिलिंगच्या नावाखाली होणारे विद्यार्थ्यांचे शोषण नीटमुळे थांबणार आहे. ही दोन्ही विधेयके लोकसभेत गेल्याच महिन्यात पारित करण्यात आली होती. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून नीटची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29178

Posted by on Aug 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (131 of 2453 articles)


=राजनाथसिंह, डोभाल यांची घेतली भेट= नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] - गेल्या महिनाभरापासून अशांतता आणि तणाव कायम असलेल्या काश्मीर खोर्‍यात शांतता ...

×